Bar Council of India: CJI गवईंचं मन मोठं, पण बार काऊन्सिलनं 'त्या' वकिलाला मोठा दणका दिलाच!

Bar Council of India: देशाचे मुख्य न्यायाधिश अर्थात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा आणि हे कृत्य करताना सनातनचा नारा देणारा माथेफिरु वकीलावर बार काऊन्सिल ऑफ इंडियानं मोठी कारवाई केली आहे.
CJI Bhushan Gavai
CJI Bhushan Gavai Sarkarnama
Published on
Updated on

Bar Council of India: देशाचे मुख्य न्यायाधीश अर्थात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुट फेकण्याचा प्रयत्न करणारा आणि हे कृत्य करताना सनातनचा नारा देणारा माथेफिरु वकीलावर बार काऊन्सिल ऑफ इंडियानं मोठी कारवाई केली आहे. या वकिलावर कोर्टात प्रॅक्टिस करण्यापासून तात्काळ प्रभावानं बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. सरन्यायाधिशांबाबत केलेल्या या अत्यंत निंदनीय प्रकाराचा आता सर्वच स्तरातून निषेध व्हायला लागला आहे.

CJI Bhushan Gavai
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेचं बिगुल वाजलं! 'इतक्या' टप्प्यात मतदान, 'या' दिवशी निकाल; निवडणूक आयोगाची घोषणा

कोण आहे हल्लेखोर?

सरन्यायाधिशांवर बीट फेकून हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचं नाव राकेश किशोर असं असून तो ७१ वर्षांचा आहे. बार काऊन्सिलचा तो २०११ पासून अस्थायी सदस्य आहे. दिल्लीच्या मयूर विहार भागातील तो रहिवासी आहे. कोर्ट क्रमांक १ मध्ये सुनावणीदरम्यान माथेफिरू राकेश किशोर या वकिलानं सकाळी ११.३५ वाजता आपल्या पायातील स्पोर्ट्स शूज काढला आणि तो सरन्यायाधिशांच्या दिशेनं भिरकावला. त्याच्या या कृतीनंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला तात्काळ पकडलं आणि सुप्रीम कोर्टाच्या सुरक्षा दलाच्या ताब्यात दिलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

CJI Bhushan Gavai
Floods: महापूराची पहाणी करायला गेलेल्या भाजप आमदार-खासदाराला बेदम मारहाण; केलं रक्तबंबाळ

पोलिसांनी चौकशीनंतर दिलं सोडून

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या माथेफिरु विकालाची चौकशी केली. यावेळी त्याच्याकडं एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये त्यानं लिहिलं की माझा हा संदेश प्रत्येक सनातनीसाठी आहे. सनातन धर्माचा अपमान हिंदुस्तान कधीही सहन करणार नाही. पोलिसांना त्याच्याकडं सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन, शाहदरा बार असोसिएशन आणि दिल्ली बार काऊन्सिल या संघटनांचा सदस्य असल्याचं कार्डही आढळून आलं आहे.

CJI Bhushan Gavai
Manoj Jarange Patil : छगन भुजबळांच ऐकून काँग्रेस अन् आपलं करिअर संपवू नका! विजय वडेट्टीवारांना इशारा

सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रार जनरल यांनी दिल्ली पोलिसांकडून राजेश किशोर याची कस्टडी मागितली. सुत्रांच्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रार जनरलची मंजुरी मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा दल आणि नवी दिल्लीच्या जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. चौकशीनंतर तीन तासानंतर त्याला सोडून देण्यात आलं. कारण रजिस्ट्रानं या वकिलाविरोधात आरोप लावण्यास नकार दिला.

CJI Bhushan Gavai
Gautami Patil: गौतमी पाटील सहीसलामत सुटली! पुणे पोलिसांनी प्रचंड राबून केला तपास

बार काऊन्सिलचा कारवाईचा इशारा

दरम्यान, बार काऊन्सिलनं या कृत्याची गंभीर दखल घेत माथेफिरु राजेश किशोर याला तात्काळ प्रभावानं कोर्टात प्रॅक्टिस करण्यापासून बडतर्फ करण्यात आलं. भाजपचे खासदार आणि बार काऊन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांच्याशी म्हटलं की, हा अत्यंत दुःखद आणि लाजिरवाणा प्रकार घडला आहे. आपले सीजेआय देखील सनातनी आहेत, ते मंदिरात जातात, या घटनेनं देशतील सर्व वकिलांची लाज काढली आहे. याविरोधात आम्ही कारवाई करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com