Census 2027 Update : जनगणना कर्मचाऱ्यांची शनिवार, रविवारची सुटी रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Karnataka census 2027 : कर्नाटक राज्यात सध्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील कामाला गती देणारा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात याबाबत कडक पावले उचलली गेली आहेत.
India digital census 2027
India digital census 2027Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. बेळगाव जिल्ह्यात जनगणना २०२७ च्या तयारीसाठी प्रशासनाने कडक आदेश जारी केले आहेत.

  2. शनिवार आणि रविवार या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही अधिकाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले.

  3. जनगणना कामाच्या पहिल्या टप्प्याला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

belagavi news : बेळगाव जिल्ह्यात जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील कामाला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी (ता. २४) जारी केलेल्या आदेशानुसार २५ एप्रिलचा चौथा शनिवार आणि २६ एप्रिलचा रविवार या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही जनगणना कामाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर राहण्याची सक्ती केली आहे.

सध्या जिल्ह्यात सर्वत्र हाऊस लिस्टिंग तथा घरगणना ही अत्यंत महत्त्वाची प्राथमिक प्रक्रिया सुरू आहे. या टप्प्यात प्रत्येक घराची नोंद, मूलभूत माहिती संकलन आणि डेटाचे संकलन करण्यात येत आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे पुढील टप्प्यांसाठी अत्यंत गरजेचे असल्याने प्रशासन कोणताही विलंब होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने सुट्टीच्या दिवशीही काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशाच्या कक्षेत जनगणना चार्ज अधिकारी, शिरस्तेदार, व्यवस्थापक, केसवर्कर्स, तांत्रिक सहाय्यक, जवान, गणतीदार आणि पर्यवेक्षक यांच्यासह सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्वांनी आपल्या मुख्यालयात उपस्थित राहून नेमून दिलेली जबाबदारी नियमितपणे पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

India digital census 2027
Karnataka-Marathi Issue: मराठीद्वेष की टेक्निकल चूक? कर्नाटकातील परीक्षेच्या निकालात घडला संतापजनक प्रकार

कोणालाही या कालावधीत रजा मंजूर केली जाणार नाही, असेही सूचित करण्यात आले आहे. प्रशासनाने कामाच्या गुणवत्तेलाही तितकेच प्राधान्य दिले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मागवली जाणारी माहिती, अहवाल किंवा आकडेवारी तात्काळ आणि अचूक स्वरूपात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, कामात विलंब किंवा माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास त्याकडे गांभिर्याने पाहिले जाईल, असा इशारा आदेशात देण्यात आला आहे. याशिवाय, आदेशाचे पालन न करता विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विद्यमान कायदे व नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

India digital census 2027
Karnataka Politics : सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? काँग्रेसमध्ये बदलाच्या चर्चा पुन्हा तेजीत, शिवकुमारांची ताकद वाढली

FAQs :

1. बेळगावमध्ये कोणता आदेश जारी करण्यात आला आहे?
जनगणना कामासाठी अधिकाऱ्यांना सुट्टीच्या दिवशीही कामावर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

2. हा आदेश कोणी दिला आहे?
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हा आदेश जारी केला आहे.

3. कोणत्या दिवशी काम करण्याची सक्ती आहे?
२५ एप्रिल (शनिवार) आणि २६ एप्रिल (रविवार) या दिवशी काम करण्याचे आदेश आहेत.

4. हा निर्णय का घेण्यात आला?
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याचे काम जलद पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

5. या आदेशाचा परिणाम कोणावर होणार आहे?
जनगणना कामाशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हा आदेश लागू होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com