BJP Election Campaign : …तभी तो सब मोदी को चुनते हैं! भाजपचं नवं गाणं, प्रचाराचा नारळ फोडला

LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा आजपासून प्रचार सुरू...
BJP Theme Song
BJP Theme SongSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा पुन्हा चालणार, अशी अपेक्षा पक्षाला आहे. केंद्र सरकारने केलेली कामे आणि मोदीलाटेवर स्वार होण्यासाठी पक्ष सज्ज झाला असून आजपासून प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली. निवडणुकीसाठी पक्षाचे नवे गाणे आज लाँच करण्यात आले. (LokSabha Election 2024 BJP Theme Song)

भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी नवे गाणे लाँच केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची व्हर्च्युअल उपस्थिती होती. नव्या गाण्यामध्ये अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान मोदींनाच अधिक फोकस करण्यात आले आहे. ‘सपने नहीं हकीकत बुनते हैं, तभी तो सब मोदी को चुनते हैं...’ या हिंदी गाण्यातून मोदी सरकारच्या (Modi government) कामांचे कौतुक करण्यात आले आहे.

BJP Theme Song
Manoj Jarange Speech : शरीर साथ देईना, पाय सुजले, वात आला... ; जरांगेंच्या भाषणाने जनसमुदाय भावूक!

पंतप्रधान आवास योजना, हरघर जल, मेट्रो, महिला सक्षमीकरण, चांद्रयान मोहीम, स्वच्छता अभियान, मेक इन इंडिया, स्टार्ट अप अशा विविध योजनांचे व्हिडीओ या गाण्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. विकसित होत असलेल्या भारतासाठी सर्व जण मोदींचीच निवड करीत असल्याचे या गाण्यातून सांगण्यात आले आहे. या गाण्याच्या माध्यमातून भाजपने आज लोकसभेच्या प्रचाराचा अधिकृतपणे नारळ फोडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांशी संवाद साधला. देश २०४७ पर्यंत विकसित भारताच्या दिशेने काम करीत आहे. भारताची दिशा काय असेल, हे तुमचे मत ठरवणार आहे. पुढील २५ वर्षांत तुमच्यावर विकसित भारतनिर्मितीची जबाबदारी आहे. तुमचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे, यासाठी ही सुवर्णसंधी असल्याचे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, 18 ते 25 या वयात जीवनातील अनेक बदलांचे साक्षीदार होता येते. या बदलांमध्ये तुम्हाला एक जबाबदारी पार पाडायची आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला हातभार लावण्याची जबाबदारी. कोणत्याही नव्या सुरुवातीसाठी या वयात अधिक उत्साह असतो. अनेक क्षेत्रे युवकांवर अवलंबून आहेत. देशाची दिशा कशी असेल, हे ठरवण्याचे महत्त्वाचे माध्यम मतदान आहे. त्यामुळे देशाचे भाग्य उज्ज्वल करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन मोदींनी केले.

R...

BJP Theme Song
Bharat Bandh : शेतकऱ्यांनो, शेतात काम करू नका! राकेश टिकैत यांच्याकडून ‘भारत बंद’ची हाक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com