BJP Politics : भाजपला 'या’ दोन नेत्यांशी शत्रुत्व परवडणारं नाही; आता हाता-पायाच पडावं लागणार...

NDA Government Naveen Patnaik Jagan Mohan Reddy Rajya Sabha : मोदी सरकारला मागील टर्ममध्ये नवीन पटनायक व जगनमोहन रेड्डी यांचे खासदार संसदेत मदत करत होते.
Naveen Patnaik, Narendra Modi, Jagan Mohan Reddy
Naveen Patnaik, Narendra Modi, Jagan Mohan ReddySarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने सरकार स्थापन केले. एनडीएकडे लोकसभेत बहुमत असले तरी राज्यसभेत विधेयके मंजूर करताना नाकीनऊ येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता जुने मित्रही भाजपला मदत करणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

राज्यसभेत बहुमताचा आकडा 113 हा आहे. तर एनडीएचे राज्यसभेतील संख्याबळ केवळ 101 आहे. भाजपचे 86 खासदार राज्यसभेत आहेत. एनडीएला लोकसभेत कोणतीही अडचण नसली तरी राज्यसभेत घाम गाळावा लागणार आहे. त्यासाठी दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या हातापाया पडल्याशिवाय गत्यंतर नाही.

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस हे दोन्ही पक्ष भाजपला संसदेत अनेकदा मदत करायचे. त्यांच्याच भरवशावर भाजपने अनेक महत्वाची विधेयके राज्यसभेत पारित केली आहेत. पण आता चित्र वेगळे आहे.

Naveen Patnaik, Narendra Modi, Jagan Mohan Reddy
Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्यानंतर कोण? अतिरिक्त जिल्हाधिकारी देसाईंची घोडेस्वारी वादात...

विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राज्यांतील चित्र बदलले आहे. ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी नवीनबाबूंना टार्गेट केले होते. त्यांची सत्ताही घालवली. आंध्र प्रदेशातही भाजपने जगनमोहन यांचे कट्टर विरोधक चंद्राबाबूंशी हातमिळवणी करत त्यांना धक्का दिला. या निवडणुकीनंतर दोस्त असलेले हे पक्ष आता राजकीय शत्रू बनले आहेत.  

नवीनबाबू आणि जगनमोहन यांचा पक्ष ना एनडीएमध्ये आहे ना इंडिया आघाडीत. त्यामुळे 22 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात ते कुणाला साथ देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. राज्यसभेत बीजेडीचे 9 तर जगनमोहन यांचे 11 असे एकूण 20 खासदार यावेळी भाजपसोबत नसतील, अशीच दाट शक्यता आहे. मात्र, ते इंडिया आघाडीतही नसले तरी त्यांचा सरकारला असलेला विरोध इंडियासाठी फायदेशीरच ठरणार आहे.

Naveen Patnaik, Narendra Modi, Jagan Mohan Reddy
Kumari Shailaja Vs Deepender Hooda : दोन खासदारांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कलगीतुरा; काँग्रेसमध्ये फुटू लागले फटाके  

केंद्रात सत्तेत आल्यानंतर राज्यसभेतील गणितं बदलली आहे. पहिल्याच अधिवेशन सरकार कोणती विधेयके आणणार आणि किती पारित करू शकणार, हे पाहावे लागणार आहे. पण त्यासाठी दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांच्या हातापाया पडावं लागणार, असेच सध्याचे तरी चित्र आहे. कारण बीजेडी आणि वायएसआर काँग्रेस या दोन पक्षांशिवाय राज्यसभेत भाजपला दुसरा दोस्त मिळणे कठीण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com