IRS M Anusuya : सरकारचा ऐतिहासिक निर्णय; महिला IRS अधिकाऱ्याला लिंग व नाव बदलण्यास मान्यता

Modi Government Indian Revenue Department M Anukathir Surya : एम अनुसूया या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला लिंग व नाव बदलण्यास मोदी सरकारने परवानगी दिली आहे.
IRS M Anusuya
IRS M AnusuyaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : देशाच्या नागरी सेवेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका अधिकाऱ्याला लिंग बदलण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे अधिकृत कादपत्रांवर एका महिला IRS अधिकाऱ्याचा लिंग व नाव बदलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने नुकतीच ही मान्यता दिली आहे. एम अनुसूया असे या महिला IRS अधिकाऱ्याचे नाव आहे. सध्या त्या हैद्राबादमध्ये कस्टम विभागात सह आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांनी मंत्रालयाकडे कागदपत्रांवर लिंग व नाव बदलासाठी अर्ज केला होता.

IRS M Anusuya
Mallikarjun Kharge : लोकसभेमुळं खर्गे यांचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात? असं आहे राज्यसभेतील गणित…

अनुसूया यांनी लिंग बदलाची शस्त्रक्रिया केल्यानंतर केंद्र सरकारकडे अर्ज केला होता. अनुसूया यांचा लिंग बदलाचा अर्ज मान्य करण्यात आल्यानंतर आता त्यांना एम. अनुकथिर सूर्या हे नवे नाव मिळाले आहे. त्यानुसार सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये नावांत बदल होणार आहे. त्या 35 वर्षांच्या आहेत. अनुसूया यांना आयआरएस झाल्यानंतर 2013 मध्ये चेन्नईत सहायक आयुक्त म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली होती. 2018 मध्ये उपायुक्तपदी त्यांनी बढती झाली.

सूर्या यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी येथून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून सायबर लॉमध्ये पदव्युत्तर पदविका मिळवली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दहा वर्षांपुर्वी लिंग बदलाबाबत एका प्रकरणात दिलेल्या निकालानंतर अनुसूया यांना अनुकथिल अशी ओळख मिळणार आहे.

IRS M Anusuya
Assembly Bypolls : लोकसभेनंतर मोदींची 7 राज्यांत आज पहिली परीक्षा; काँग्रेसनंही लावली ताकद...

काय म्हटले होते सर्वोच्च न्यायालयाने?

तृतीयपंथियांना मुलभूत मानवी अधिकार नाकारण्याचे काहीच कारण नाही. संविधानानेही त्यांना हक्क दिले आहेत. आता त्यांना ओळख देण्याची आपली वेळ आहे. त्यांना तशी अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर याची सुरूवात होणार आहे, असे न्यायालयाने दहा वर्षांपुर्वीच्या एका निकालात म्हटले होते. तसेच लिंग बदलाबाबतही न्यायालयाने सकारात्मक मत मांडले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com