Bihar Election : लागल-लागल झुलनियां में धक्का..! लालूंनी दंड थोपटले, राहुल-तेजस्वी जोडी कमाल करणार?

Lalu Prasad Yadav joins voter adhikar rally before Bihar Assembly Election : लालू प्रसाद यादव यांची बोलण्याची पध्दत संपूर्ण भारतभर लोकप्रिय आहे. आजही बिहारच्या जनतेमध्ये त्यांची क्रेझ असल्याचे दिसून आले.
Lalu Prasad Yadav with Rahul Gandhi and Tejashwi Yadav at the voter adhikar rally ahead of Bihar Assembly Elections 2025.
Lalu Prasad Yadav with Rahul Gandhi and Tejashwi Yadav at the voter adhikar rally ahead of Bihar Assembly Elections 2025.Sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi and Tejashwi Yadav get strong backing from Lalu Yadav : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने रविवारी रणशिंग फुंकले. मतदार अधिकार रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण बिहार पालथा घालण्यात येणार असून आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी त्याची सुरूवात केली. आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनीही दंड थोपटत दोन्ही नेत्यांना ताकद दिली.

बिहारमधील सासाराम येथून मतदार अधिकार रॅलीला सुरूवात झाली. राहुल, तेजस्वी यांच्यासह मल्लिकार्जून खर्गे आदी नेत्यांनी जोरदार भाषणे करत भारतीय निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. पण यामध्ये लालूंनी बाजी मारली. अवघ्या काही मिनिटांच्या भाषणानेच उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.

लालू प्रसाद यादव यांची बोलण्याची पध्दत संपूर्ण भारतभर लोकप्रिय आहे. आजही बिहारच्या जनतेमध्ये त्यांची क्रेझ असल्याचे दिसून आले. त्यांनी हातात माईक घेताच उपस्थितांमधील उत्साह दिसून आला. अनेकदा त्यांच्या बोलण्याचा अंदाज टॉनिकचे काम करत असतो. आजही तेच घडले. त्यांनी केवळ दीड मिनिटांच्या भाषणाने राहुल आणि तेजस्वी यांच्यासाठी वातावरणनिर्मितीचे काम केले.

Lalu Prasad Yadav with Rahul Gandhi and Tejashwi Yadav at the voter adhikar rally ahead of Bihar Assembly Elections 2025.
Election Commission News : मुख्य निवडणूक आयुक्तांचा राहुल गांधींना अल्टिमेटम; दिली 7 दिवसांची मुदत...

काय म्हणाले लालू?

लालू प्रसाद यादव आपल्या भाषणात म्हणाले, चोरांना हटवा, भाजपला पळवून लावा. कोणत्याही परिस्थितीत भाजपला येऊ देऊ नका. सर्व लोकांनी एक व्हावे. एकत्रितपणे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव सर्वांनी त्यांना उखडून फेका. लोकशाहीला मजबूत करा. लागल-लागल झुलनियां में धक्का, बलम कलकत्ता चला.’ लालूंनी विरोधकांना धक्का देण्याचे आवाहन यामाध्यमातून बिहारी जनतेला केले. हे एका भोजपुरी गीताचे बोल आहेत.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा सादला. ते म्हणाले, ही संविधान वाचविण्याची लढाई आहे. आज भाजप संविधानाला खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे निवडणूक, तिथे भाजपचा विजय होतो. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात एक कोटी नवे मतदार निर्माण केले. भाजपला सर्व नवे मतदान मिळते. कर्नाटकात एका विधानसभा मतदारसंघात एक लाख मतांची चोरी झाली.

Lalu Prasad Yadav with Rahul Gandhi and Tejashwi Yadav at the voter adhikar rally ahead of Bihar Assembly Elections 2025.
लग्नानंतर 9 दिवसांत पतीची हत्या अन्..! ‘यूपी’त महिला आमदारामुळे राजकीय वादळ

महाराष्ट्रात एक कोटी मतदार जादूने आले. जिथे नवे मतदार आले, तिथे भाजपचा विजय झाला. भाजपला नव मतदारांचे मतदान झाले. मी निवडणूक आयोगाला व्हिडीओ फुटेज दाखविण्याची विनंती केली, पण दाखविले गेले नाही, अशी टीका राहुल यांनी केली. तेजस्वी यांनीही राहुल यांच्या सुरात सूर मिसळला. पण लालूंच्या भाषणाने खऱ्या अर्थाने या रॅलीमध्ये उत्साह आल्याचे मानले जात आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com