Bihar Election update : बिहारमध्ये आघाडीचा मोठा धमाका; CM पदासाठी नाव जाहीर, NDA चे धाबे दणाणले...

INDIA Alliance Announces Bihar CM and Deputy CM Faces : काँग्रेसने यावेळी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एक पाऊल मागे घेत तेजस्वी यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याचा निवडणुकीत निश्चितच फायदा होईल.
PM Narendra Modi, Rahul Gandhi
PM Narendra Modi, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Bihar Political Equation Ahead of 2025 Assembly Elections : बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार ठरवताना तसेच जागावाटपात महाघोळ घालणाऱ्या इंडिया आघाडीने गुरूवारी मोठा धमाका केला. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष, विकासशील इन्सान पार्टीमध्ये सुरू असलेली रस्सीखेच सातत्याने पाहायला मिळाली. आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, यावरूनच तर्कवितर्क लढवले जात होते. त्यावरील पडदा अखेर गुरूवारी उघडला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आज राष्ट्रीय जनता दलाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे नाव जाहीर केले. आघाडीची सत्ता आल्यास तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. आघाडीने यावेळी उपमुख्यमंत्रिपदाचा चेहराही जाहीर करत मोठा डाव टाकला आहे.

विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहानी यांचे नाव उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून निश्चित करण्यात आले आहे. तेजस्वी यादव यांचे नाव जाहीर करण्यात आल्याने आघाडीतील रुसवे-फुगवे मिटल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. बिहारमध्ये तेजस्वी यांची प्रचंड लोकप्रियता आहे. मागील निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली आरजेडीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. पण काँग्रेसच्या खराब कामगिरीने आघाडीची सत्ता येऊ शकली नाही.

PM Narendra Modi, Rahul Gandhi
Local Body Elections : इच्छुकांनो, आधी हे वाचा! या कारणांमुळे बाद होतो उमेदवारी अर्ज...

काँग्रेसने यावेळी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एक पाऊल मागे घेत तेजस्वी यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याचा निवडणुकीत निश्चितच फायदा होईल. आरजेडीची संपूर्ण यंत्रणा आपल्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसविण्यासाठी सर्व मतदारसंघांमध्ये कंबर कसून काम करेल, असे त्यामागचे गणित आहे. तेजस्वी यांच्या लोकप्रियतेचाही आघाडीला फायदा होईल.

PM Narendra Modi, Rahul Gandhi
Yathindra Siddaramaiah : देशाच्या राजकारणातील मोठी बातमी; सिध्दरामय्यांच्या लेकाचं धक्कादायक भाकित, म्हणाले, वडिलांचे राजकीय करिअर...

दुसरीकडे मुकेश सहानी हे निषाद समाजातील नेते आहेत. एका मागासवर्गीय नेत्याचे उपमुख्यमंत्रिपदासाठी नाव जाहीर करत काँग्रेसने जातीय समीकरणे सांधण्याचाही प्रयत्न केला आहे. पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करत काँग्रेसने मोठा डाव टाकल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. आघाडीच्या या निर्णयामुळे ‘एनडीए’ला फटका बसू शकतो, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com