
Bihar SIR Update : बिहारमधील मतदारयादी पुनर्पडताळणी मोहिमेवरून विरोधकांनी भारतीय निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या बिहारमधील मित्रपक्षाचे नेते तेजस्वी यादवही आयोगावर तुटून पडत आहेत. मात्र, आता यादवांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आयोगावर पलटवार करणाऱ्या तेजस्वी यादव यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना आयोगाने नोटीस धाडली आहे. यादव यांनी दावा केला होता की, बिहारच्या तात्पुरत्या मतदारयादीमध्ये आपले नाव नाही. त्यासाठी त्यांनी EPIC नंबर (RAB2916120) चा हवाला देत मतदारयादीत हा नंबर नसल्याचे म्हटले होते. मात्र, आयोगाने केलेल्या पडताळणीमध्ये तेजस्वी यादव यांचे नाव मतदारयादीत दुसऱ्याच क्रमांकावर असल्याचे आढळून आले आहे.
आयोगाने तेजस्वी यादव यांचा दावा खोडून काढल्यानंतर आता यादव यांच्याकडील मतदार ओळखपत्राची खातरजमा करण्यासाठी नोटीस पाठविली आहे. त्याद्वारे आयोगाने संबंधित ओळखपत्राची संपूर्ण माहिती मागविली आहे. यादवांकडे दोन ओळखपत्र असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आयोगाने पाठविलेल्या नोटिशीला महत्व प्राप्त झाले आहे.
आयोगाने नोटिशीमध्ये म्हटले आहे, तुम्ही 2 ऑगस्ट 2025 मध्ये एका पत्रकार परिषदेत तुमचे नाव मतदारयादीत नसल्याचे सांगितले होते. मात्र, चौकशीमध्ये असे आढळून आले आहे. मतदान केंद्र संख्या २०४ (बिहार पशू विज्ञान विश्वविद्यालयाचे ग्रंथालय भवन) मधील क्रम संख्या 416 मध्ये आहे. त्याचा EPIC नंबर RAB0456228 हा आहे.
यादव यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेले संबंधित क्रमांकाचे ओळखपत्र आयोगाने जारीच केले नसल्याचे म्हटले आहे. असा नंबर आयोगाने कधीही जारी केलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता यादव यांच्याकडील ओळखपत्र बोगस आहे की काय, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यांच्याकडे हे ओळखपत्र कसे आले, याबाबतचा तपास आता आयोग करेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.