
Nagpur political news Anil Deshmukh : विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला होता. मात्र हल्ल्याकडे सुरूवातीपासूनच संशयाने बघितले जात आहे. भाजपच्या नेत्यांना राजकीय स्टंटबाजी, सलीम-जावेदची स्क्रिप्ट, असे संबोधून खिल्ली उडवली होती.
पोलिसांनी न्यायालयात सादर हल्ल्याचा बनाव, अशी समरी न्यायालयात सादर केली होती. त्यामुळे सर्वांचा संशय आणखीच बळावला होता. मात्र अनिल देशमुख यांनी फॉरेंसिक रिपोर्ट उघड करून सर्वांना उघडे पाडले. आता ‘सीआयडी' प्रमाणे आरोपप्रत्यारोपांची ही मालिका लांबतच जाणार असल्याचे दिसून येते.
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आले होते. त्यातील एक 10 किलोचा दगड त्यांच्या गाडीच्या काचेवर आदळला होता. काच फोडून तो देशमुख यांच्या डोक्याला लागला होता. त्यात ते जखमी झाले होते. त्यावेळी विधानसभा निवडणुकीचे मतदान जवळ येऊन ठेपले होते. अनिल देशमुख आपल्या मुलाचा सलील देशमुख यांचा प्रचारासाठी गेले होते. त्यामुळे या हल्ल्याकडे संशयाने बघितले जात होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सलीम-जावेदची स्क्रिप्ट, अशी संबोधले होते तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजकीय स्टंटबाजी अशी प्रतिक्रिया या घटनेवर व्यक्त केली होती. पोलिसांनी हल्ल्याचा बनाव अशी समरी न्यायालयात सादर केल्यानंतर पुन्हा एकदा ही घटना प्रकाशझोतात आली आले.
अनिल देशमुख यांच्या म्हणण्यानुसार सुरूवातीलाच पोलिसांनी रक्ताचे नमुने, माझे कपडे, गाडीमध्ये पडलेले काचेचे तुकडे, दोन्ही दगड यासह इतर साहित्य परीक्षणासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले होते. फॉरेन्सिक लॅबने त्याचे विश्लेषण करून अहवाल पोलिसांना दिला होता. असे असताना नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी गुन्हा दृश्याचे पुनर्निर्माण करून (Reconstruction of Crime Scene) नागपूर फॉरेन्सिक लॅबकडे आग्रह धरला व तसा पत्रव्यवहार केला.
नागपूर फॉरेन्सिक लॅबने नकार दिल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी मुंबई येथील फॉरेन्सिक लॅबकडे पत्रव्यवहार केला. एकदा फॉरेन्सिकने वरील गोष्टीबाबत स्पष्ट रिपोर्ट दिल्यानंतर परत तीच गोष्ट करण्याची गरज काय, असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित होते. पोलिस अधीक्षकांवर कोणाचा दबाव होता, याचा तपास होणे गरजेचे आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक अहवाल बदलविण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी अनेक प्रयत्न केले. परंतु, जी घटना घडली, तसाच अहवाल फॉरेन्सिकचा आला. यामुळे शेवटी पोलिसांनी नागपुरातील कारला काच बसवणाऱ्या खाजगी कंपनीच्या मॅनेजरचे मत घेऊन 'बी-समरी' न्यायालयात सादर केली.
फॉरेन्सिक अहवालावर पोलिसांना कुठलेही वैज्ञानिक पर्याय देण्याचे अधिकार नसताना बी-समरीमध्ये न्यायालयासमोर चुकीचे मत नोंदविल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. एका व्यक्तीने मोठा दगड समोरच्या काचेवर मारला, तर दुसऱ्याने एक लहान दगड माझ्या बाजूच्या काचेवर मारला, त्यामुळे काच फुटून माझ्या डोक्याला जखम झाली, असे तज्ञांच्या फॉरेन्सिक अहवालात नमूद आहे. असे असताना एका खाजगी व्यक्तीच्या अहवालावरून ही घटना बनावट होती, असा अहवाल न्यायालयात सादर करण्यात केल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.