
Bihar scam news : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यांच्या कार्यकाळात चारा घोटाळा झाला होता. संपूर्ण देशभरात हा घोटाळा प्रचंड गाडला. तब्बल 903 कोटी रुपयांचा हा घोटाळा होता. पण आता बिहारमध्ये चारा घोटाळ्यापेक्षा तब्बल 70 पटींहून अधिक म्हणजेचज 70 हजार कोटींचा घोटाळा झाल्याच्या दाव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यासाठी कॅगच्या अहवालाचा आधार घेण्यात आला आहे.
काँग्रेसने बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एनडीए सरकारवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. पक्षाचे नेते पवन खेडा यांनी बिहार सरकारमध्ये तब्बल 70 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी त्यासाठी 2023-24 या काळातील कॅगच्या अहवालाचा हवाला दिला आहे. सरकारमधील विविध विभागांनी उपयोगिता अहवास जमा केलेला नसल्याचे खेडा यांनी म्हटले आहे.
खेडा यांनी केलेल्या दाव्यानुसार, ही रक्कम बिहारच्या वार्षिक बजेटचा एक तृतियांश हिस्सा आहे. त्याला रोखले नाही तर पुढील काळात 1.40 लाख कोटींचा घोटाळा होऊ शकतो. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, बिहार सरकारने 70 हजार 877 कोटी रुपयांच्या योजनांचा उपयोगिता अहवाल 18 महिन्यांच्या आता जमा केला नाही तर ते नियमांच्या विरुध्द असेल.
हा पैसा आरोग्य, शिक्षण आदी महत्वाच्या पायाभूत सुविधांशी संबंधित विभागांचा होता. पण त्याचा हिशोब गायब आहे. हे खरं असेल तर बिहारच्या विकासाच्या बजेटवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कॅगचा रिपोर्ट भ्रष्टाचारा पुरावा असल्याचा आरोप खेडा यांनी केला आहे. पंचायती राज विभागात सर्वाधिक २28,154 कोटी रुपयांचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही.
शिक्षण विभाग 12,623 कोटी, शहरी विकास विभाग 11,065 कोटी, ग्रामीण विकास विभाग 7,800 कोटी तर कृषी विभागातील 2,107 कोटी रुपयांचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले नाही. नितीश कुमार सरकारने घोटाळा लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, बिहार सरकारकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी ही नियमित अकाऊंटिंग प्रक्रिया असल्याच दावा केला आहे. त्यांनी नुकतेच विधानसभा अधिवेशनात 2022-23 मधील 1.09 लाख कोटींच्या उपयोगिता प्रमाणपत्रांबाबत खुलासा केला होता. हा प्रक्रियेतील विलंबाचे प्रकरण आहे. यात घोटाळा झालेला नाही. मागील पाच वर्षांतील उपयोगिता प्रमाणपत्रांना झालेला विलंब सर्वात कमी असल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.