Narendra Modi News : पंतप्रधान मोदींचा लोकसभेत करारा जवाब; 5 संदेश अन् 3 सूत्रांमधून केला स्ट्राईक...

PM Narendra Modi's Statement on Operation Sindoor : मी विजयी भावनेतून या सभागृहात भारताचा बाजू मांडण्यासाठी उभा आहे. ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना मी आरसा दाखविण्यासाठी उभा आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Operation Sindoor debate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर बोलताना पुन्हा एकदा पाकिस्तान आणि दहशतवादी ‘आकां’ना करारा जवाब दिला आहे. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान भारताने दिलेले पाच संदेश आणि तीन सूत्रांमधून ऑपरेशन सिंदूर कसे यशस्वी झाले, हे मोदींनी स्पष्टपणे सांगितले.

संसदेत आपण ऑपरेशन सिंदूरचा वियजोत्सव साजरा करत असल्याचे सांगताना मोदी म्हणाले, हा विजयोत्सव दहशतवादी तळांना मातीत मिळवण्याचा आहे. हा विजयोत्सव सिंदूरची शपथ पूर्ण करण्याचा आहे. भारतीय सेनेच्या शौर्याचा विजयोत्सव आहे. 140 कोटी भारतीयांची एकता, इच्छाशक्ती, त्याच्या अप्रतिम विजयाचा विजयोत्सव आहे. मी याच विजयी भावनेतून या सभागृहात भारताचा बाजू मांडण्यासाठी उभा आहे. ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना मी आरसा दाखविण्यासाठी उभा आहे.

ऑपरेशन सिंदूरमधून भारताची बाजू मांडताना मोदी म्हणाले, पहिली बाजू म्हणजे, पहलगाम हल्ल्यानंतरच पाकिस्तानी सैन्याला अंदाज आला होता की, भारत मोठी कारवाई करणार. त्यांच्याकडून आण्विक धमकीही येत होती. भारताने 6 मे रात्री आणि 7 मेला सकाळी ठरल्याप्रमाणे कारवाई केली. पाकिस्तान काहीच करू शकले नाही. 22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला 22 मिनिटांत सैन्याने घेतला.

Narendra Modi
Rajya Sabha debate : राज्यसभेत 'मेंटल बॅलन्स'वरून खर्गे संतापले; आता सोडणार नाही म्हणताच नड्डांवर माफी मागण्याची वेळ

दुसरी बाजू म्हणजे, पाकिस्तानसोबत लढाई तर अनेकदा झाली आहे. पण ही पहिली भारताची रणनीती बनली, ज्यामध्ये आधी आपण कधी गेलो नव्हतो, तिथे गेलो. पाकिस्तानच्या कानाकोपाऱ्यातील दहशतवादी तळे उद्ध्वस्त केले. तिसरी बाजू म्हणजे, पाकिस्तानची आण्विक धमकीला आपण खोटे सिध्द केले. भारताने सिध्द केले की, न्युक्लिअर ब्लॅकमेलिंग आता चालणार नाही. त्यासमोर भारत झुकणारही नाही, असे मोदींनी ठणकावून सांगितले.

चौथी बाजू म्हणजे, भारताने आपली तांत्रिक क्षमता दाखवून दिली. पाकिस्तानमधील एअरबेस असेट्सला मोठे नुकसान पोहचवले. आजपर्यंत त्यांचे काही एअरबेस आयसीयूमध्ये आहेत. आज टेक्नॉलॉजी आधारीत युग आहे. ऑपरेशन सिंदूर त्यातही यशस्वी ठरल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

Narendra Modi
Shrikant Shinde : मॅच्युअर व्हा, महापालिकेत नाय आता..! लोकसभेतच '50 खोके एकदम ओके' म्हणणाऱ्या महिला खासदारावर श्रीकांत शिंदे भडकले...

पाचवी बाजू म्हणजे, ऑपरेशन सिंदूरदरम्यान पहिल्यांदाच असे झाले की, भारताच्या आत्मनिर्भर ताकदीला जगाने ओळखले. मेड इन ड्रोन, मिसाईल्सने पाकिस्तानच्या हत्यारांची पोलखोल केली. या ऑपरेशनमध्ये नेव्ही, आर्मी, एअरफोर्स तिन्ही दलांचे संयुक्त कारवाईने पाकिस्तानला धूळ चारल्याचे मोदींनी सांगितले.

ऑपरेशन सिंदरूमध्ये भारताने तीन सूत्र तयार केल्याचेही मोदींनी सांगितले. पहिले, भारतात दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही आपल्या पध्दतीने, आपल्या अटींवर, आपल्या वेळेत उत्तर दिले जाईल. दुसरे, कोणतीही न्युक्लिअर ब्लॅकमेलिंग चालणार नाही. आणि तिसरे म्हणजे, आम्ही दहशतवादाला समर्थन करणारे सरकार आणि दहशतवाद्यांच्या ‘आकां’ना वेगळे पाहणार नाही, असे मोदी म्हणाले.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com