DK Shivakumar Video : मी तर ‘रॉयल चॅलेंज’ पितही नाही..! RCB च्या प्रश्नावर शिवकुमार नको ते बोलले अन्...

DK Shivakumar's Unexpected Response on RCB : आरसीबीची मालकी असलेल्या कंपनीने संघाची किंमत 2 बिलियन डॉलर निश्चित केल्याची चर्चा आहे. या चर्चांच्या अनुषंगाने बोलताना शिवकुमार यांनी नको ते विधान केले आहे.
Karnataka Deputy CM DK Shivakumar addresses the media on the RCB ownership question, delivering a quirky remark that has gone viral.
Karnataka Deputy CM DK Shivakumar addresses the media on the RCB ownership question, delivering a quirky remark that has gone viral. Sarkarnama
Published on
Updated on

DK Shivakumar RCB statement : रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. त्यामुळे या संघाचे व्यवस्थापन वादात सापडले आहे. त्यातच संघाच्या मालकी असलेल्या कंपनीने विक्री करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यामध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचेही नाव चर्चेत आहे.

आरसीबीची मालकी असलेल्या कंपनीने संघाची किंमत 2 बिलियन डॉलर निश्चित केल्याची चर्चा आहे. या चर्चांच्या अनुषंगाने बोलताना शिवकुमार यांनी नको ते विधान केले आहे. त्यानंतर त्यांच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. शिवकुमार हे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सदस्यही आहेत.

काय म्हणाले शिवकुमार?

आरसीबी संघ विकत घेण्याची चर्चा फेटाळून लावताना शिवकुमार यांनी अजब तर्क दिला. आता त्याचीच सर्वाधिक चर्चा होऊ लागली आहे. ते म्हणाले आहेत की, ‘मला आरसीबीची गरज नाही. मी तर रॉयल चॅलेंज पीतही नाही.’ याच विधानाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

Karnataka Deputy CM DK Shivakumar addresses the media on the RCB ownership question, delivering a quirky remark that has gone viral.
'या' तरुणीचे शरद पवारांसमोर खणखणीत भाषण...

मी वेडा माणूस नाही. मी अनेक वर्षांपासून कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचा सदस्य आहे. माझ्याकडे वेळही नाही. मी शैक्षणिक संस्थांवरील पदे सोडून कुटुंबातील लोकांना दिली. मला आरसीबीच्या व्यवस्थानात सहभागी होण्यासाठी प्रस्ताव आला होता, पण मला आरसीबीची गरज नाही. मी तर रॉयल चॅलेंज पीतही नाही, असे शिवकुमार म्हणाले आहेत.

दरम्यान, आरसीबीची मालकी असलेल्या Diageo India कंपनीने विक्रीबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. कंपनीने म्हटले आहे की, आरसीबी संघ विक्रीबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. या बातम्या केवळ अफवा आहेत. कंपनीकडून तसा विचारही केला जात नसल्याचे कंपनीच्या मितल संघवी यांनीही स्पष्ट केले आहे.

Karnataka Deputy CM DK Shivakumar addresses the media on the RCB ownership question, delivering a quirky remark that has gone viral.
Trump Vs Musk : अखेर मस्क यांची तंतरली; ट्रम्प यांच्यासमोर लोटांगण, दोन वाक्यांतच विषय कट...

आरसीबीच्या विजयी रॅलीदरम्यान 11 क्रिकेटप्रेमींचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरसीबीच्या अधिकाऱ्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयानेही या घटनेची दखल घेतली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असून सरकारकडून आरसीबीसह कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयवरही ठपका ठेवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com