Bihar : तेजस्वी यादवांकडून CBI च्या समन्सला केराची टोपली ; 'या' कारणासाठी चौकशीस गैरहजर..

Bihar Land for Jobs Scam News : तेजस्वी यादव यांची पत्नी गर्भवती आहे.
tejashwi yadav
tejashwi yadavSarkarnama
Published on
Updated on

Bihar Land for Jobs Scam News : सक्तवसुली संचालनालयाने (ED) काल (शुक्रवारी) बिहारमध्ये छापेमारी केली आहे.त्यानंतर आज (शनिवारी) सीबीआयने बिहारचे उपमुख्यमंत्री, राजदचे नेता तेजस्वी यादव यांना समन्स बजावले होते. आज त्यांची चौकशी होणार होती. पण तेजस्वी यादव यांनी आपण आज चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे.

तेजस्वी यांना यापूर्वीही ४ मार्च रोजी समन्स् बजावले होते. आज त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले होते. जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळाप्रकरणी काल (शुक्रवारी) बिहारमध्ये छापेमारी करण्यात आली आहे.

आजही बिहारमध्ये राजदच्या अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी झाली. लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची दोन दिवसापासून चौकशी सुरु आहे. पत्नीच्या आजारपणाचे कारण देत तेजस्वी यादव यांनी चौकशीला हजर राहणार असल्याचे ईडीला कळविले आहे.

त्यांच्या पत्नीची काल बारा तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला होता. तेजस्वी यादव यांची पत्नी गर्भवती आहे. रक्तदाब वाढल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी जमीनच्या बदल्यात रेल्वेत काही जणांना नोकरी दिली होती, याप्रकरणी त्यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे . १५ मार्च रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

tejashwi yadav
Land for Jobs Scam: 'जमीन द्या ,रेल्वेत नोकरी मिळवा' ; लालू प्रसाद यादव यांनी असा केला गैरव्यवहार

या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडीदेवी, कन्या मीसा भारती यांच्यासह १४ अन्य जणांना १५ मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

२००९ ते २००९ मधील हा प्रकार आहे. लालू प्रसाद यादव तेव्हा रेल्वेमंत्री होते. त्यांनी आपला पदाचा गैरउपयोग करुन १२ जणांना रेल्वेत ग्रुप डीमध्ये नोकरी दिली होती. यातील सात जणांना जमीनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचे चौकशीत आढळले आहे.

सीबीआयने काल (शुक्रवारी) देशभरात २५ ठिकाणी छापेमारी केली होती. यात लालू प्रसाद यादव यांच्या कन्या, मुलगा तेजस्वी यादव आणि कुटुंबियांकडून ७० लाख रुपयांची रक्कम, दोन किलो सोने, परकीय चलन, सोन्याची नाणी जप्त करण्यात आली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com