
Administration Issues Certificate to ‘Dog Babu’ : सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कामातील हलगर्जीपणा किती टोकाला जाऊ शकतो, याचे सर्वात मोठे उदाहरण समोर आले आहे. प्रशासनाकडून एका श्वानाच्या नावाने चक्क रहिवासी दाखला जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दाखल्यावर एका श्वानाचा फोटोही छापण्यात आला आहे. हा दाखला व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनही हादरून गेले आहे.
बिहारमधील पटना जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. पटनातील मसौढी अंचल येथील प्रशासनाने हा रहिवासी दाखला जारी केला आहे. डॉग बाबू या नावाने हा दाखला देण्यात आला असून त्यावर वडिलांचे नाव कुत्ता बाबू असे नमूद करण्यात आले आहे. तर आईचे नाव कुटिया देवी असे लिहिले आहे. हा दाखला सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
डॉग बाबू नावाने जारी करण्यात आलेल्या या दाखल्याची माहिती पटना जिल्हा प्रशासनाला समजल्यानंतर ते तातडीने रद्द करण्यात आले आहे. तसेच संबंधित दाखला तयार करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रशासनाने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.
बिहारमध्ये सध्या निवडणूक आयोगाकडून मतदारयादी पुनर्पडताळणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी मागील काही दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे रहिवासी दाखल्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. हा आकडा रेकॉर्डब्रेक असल्याचे सांगितले जात आहे. बिहार सरकारकडूनही याबाबत माहिती देण्यात आली होती. तसेच रहिवासी दाखले देताना विशेष तपासणी करण्याचे आदेशही सरकारने दिले होते.
सरकारकडून कडक सूचना देऊनही डॉग बाबू नावाने रहिवासी दाखला जारी करण्यात आल्याने प्रशासनाला धक्का बसला आहे. पटना जिल्हा प्रशासनाने याबाबत सोशल मीडियात पोस्ट करून हा दाखला रद्द केल्याची माहिती दिली आहे. अर्जदार, संगणक ऑपरेटर आणि दाखला जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात एफआय़आर दाखल केला जात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.