Operation Sindoor Debate : राजनाथ सिंह यांचा 3 शब्दांतच विरोधकांवर स्ट्राईक, पण काही मिनिटांतच गोगोईंनीही टाकला बॉम्ब

Rajnath Singh’s Opening Statement in Lok Sabha : राजनाथ सिंह यांच्या भाषणानंतर काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांचे भाषण झाले. सुरूवातीलाच त्यांनी जोरदार हल्ला चढवत पहलगामध्ये दहशतवादी आलेच कसे, हा मुद्दा उपस्थित केला.
Defence Minister Rajnath Singh and Gaurav Gogoi addresses Lok Sabha during the special debate on Operation Sindoor following the Pahalgam terror attack.
Defence Minister Rajnath Singh and Gaurav Gogoi addresses Lok Sabha during the special debate on Operation Sindoor following the Pahalgam terror attack. Sarkarnama
Published on
Updated on

Opposition Questions Led by Gaurav Gogoi : संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेला सुरूवात केली. त्यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने जगाच्या पातळीवर देशाने दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा फाडल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी या ऑपरेशनदरम्यान विरोधकांनी एकजुटपणे सरकारला समर्थन दिल्याबद्दल त्यांनी आभारही मानले.

ऑपरेशन सिंदूर म्हणजे तिन्ही सैन्यदलाच्या समन्वयाचे उत्तर उदाहरण असल्याचे सांगत राजनाथ सिंह म्हणाले, भारतीय हवाईदलाने आकाशातून हल्ले केले, सैन्यदलाने जमीनवर मोर्चा सांभाळला, आपले जवान नियंत्रण रेषेवर पूर्ण ताकदीने उभे होते. पाकिस्तानला करारा जवाब देण्यात आला. ऑपरेशन सिंदूरचा उद्देश केवळ दहशतवाद्यांचे कॅंप टार्गेट होते.

राजनाथ सिंह यांनी विरोधकांकडून घेतलेल्या आक्षेपांनाही उत्तरे दिली. ते म्हणाले, विरोधकांनी एकदाही आम्हाला विचारले नाही की, आपल्या सैन्याने शत्रूचे किती मारले. त्यांनी हे विचारायला हवे, की भारताने पाकिस्तानतील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली का, याचे उत्तर आहे, होय. तुम्ही हे विचारायला हवे की, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले का, याचे उत्तर हे, होय. तुम्ही हे विचारायला हवे की, या ऑपरेशनमध्ये आपल्या शूर सैनिकांचे काही नुकसान झाले का, याचे उत्तर आहे, नाही.

Defence Minister Rajnath Singh and Gaurav Gogoi addresses Lok Sabha during the special debate on Operation Sindoor following the Pahalgam terror attack.
Srinagar terror operation : मोठी बातमी : संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असतानाच 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

आपल्या भाषणादरम्यान राजनाथ सिंह यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यावरून विरोधकांवरही निशाणा साधला. त्यावेळी या हल्ल्यामागे पाकिस्तानाचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. पण तत्कालीन सरकारने त्याचवेळी पाकिस्तानाला धडा शिकविण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकसारखी पावले उचलायला हवी होती, असे राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह यांच्या भाषणानंतर काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांचे भाषण झाले. सुरूवातीलाच त्यांनी जोरदार हल्ला चढवत पहलगामध्ये दहशतवादी आलेच कसे, हा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौरा सोडून भारतात आले, पण त्यानंतर पहलगाममध्ये जाण्याऐवजी बिहारमध्ये गेले आणि निवडणुकीचे भाषण दिल्याची टीकाही गौरव गोगोईंनी केली.

Defence Minister Rajnath Singh and Gaurav Gogoi addresses Lok Sabha during the special debate on Operation Sindoor following the Pahalgam terror attack.
Bihar SIR : संसदेत जोरदार हंगामा, पण त्याआधीच निवडणूक आयोगाचा विरोधकांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

सीडीएस एका मुलाखतीत जेट विमान पडल्याची कबुली देतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाच जेट पडल्याचे सांगतात. आपल्याकडे केवळ 35 राफेल आहेत. त्यापैकी एक राफेलचे जरी नुकसान झाले तरी ते खूप मोठे आहे. याची माहिती राजनाथ सिंह द्यावी, अशी मागणी गोगोईंनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित केला होता.

जगातील विविध आर्थिक संस्थांकडून पाकिस्तानाला होत असलेल्या आर्थिक मदतीवरही त्यांनी बोट ठेवले. आपली परराष्ट्र नीती यशस्वी ठरली, असे आपण कोणत्या तोंडाने म्हणू शकतो, अशी टीका गोगोई यांनी केली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान आपण आता कराचीमध्ये उठू असे वाटत होते. पण अचानक शस्त्रसंधी जाहीर केली जाते. आपण कुणाच्या दबावाखाली होतो, असा सवालही गोगोईंनी केला. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com