32 वर्षांपूर्वीचा गुन्हा अन् रात्रीतच कोर्ट सुरू करुन सरकारने पप्पू यादवांना अडकवलं

बिहारमध्ये भाजप खासदार राजीव प्रताप रुडीयांच्या तीसहून अधिक नव्या रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याची धक्कादायक बाब पप्पू यादव यांनी समोर आणली होती.
bihar police arrests former mp pappu yadav in 32 years old case
bihar police arrests former mp pappu yadav in 32 years old case
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : बिहारमध्ये (Bihar)  भाजपचे (BJP) खासदार राजीव प्रताप रुडी (Rajiv Pratap Rudy) यांच्या तीसहून अधिक नव्या रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याची धक्कादायक बाब जन अधिकार पक्षाचे अध्यक्ष व माजी खासदार पप्पू यादव (Pappu Yadav) यांनी समोर आणली होती. यावर सरकारने त्यांना अटक करण्यासाठी 32 वर्षांपूर्वीचे अपहरण प्रकरण उकरुन काढले आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासाठी न्यायालयाचे कामकाज रात्री सुरू करण्यात आले. 

बिहारमधील सारण येथील भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या रुग्णवाहिका पडून आहेत. त्यांनी खासदार निधीतून खरेदी केलेल्या या रुग्णवाहिका आहेत. रुडी यांच्या मालकीच्या जागेवर या रुग्णवाहिका झाकून ठेवण्यात आलेल्या होत्या. बिहारमध्ये अनेक रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसल्याचे चित्र आहे. याचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका धूळ खात पडून असल्याचे पप्पू यादव यांनी समोर आणले होते. 

बिहारमध्ये पप्पू यादव यांच्या अटकेवरुन राजकारण तापले आहे. त्यांना पोलिसांनी 32 वर्षांपूर्वीच्या अपहरण प्रकरणात अटक केली आहे. यादव आणि त्यांच्या 4 सहकाऱ्यांनी दोन युवकांचे 29 जानेवारी 1989 रोजी अपहरण केले होते.  काही दिवसांनंतर हे दोन्ही युवक सुखरुपपणे परत आले होते. या प्रकरणी त्यांना जामीनही मंजूर झाला होता. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. 

यादव यांच्या अटकेवरुन जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी यादव यांच्यासाठी रात्रीच न्यायालयाकडे विनंती करुन ते सुरू केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. यादव यांना सुपौल कारागृहात ठेवण्यात आले आहे. तेथूनच ही सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 
 
दरम्यान, अटकेवरुन पप्पू यादव यांनी थेट मुख्यमंत्री नितीशकुमार यांना इशारा दिला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, नमस्कार नितीशजी, माझ्या धैर्याची परीक्षा घेऊ नका अन्यथा जनता कायदा हातात घेईल. त्यावेळी तुमचे सारे प्रशासन लॉकडाउन विसरून जाईल. एक महिन्यापूर्वीच माझे ऑपरेशन झाले आहे, तरीही मी माझे आयुष्य डावावर लावून इतरांचे जीव वाचवत आहे. आताच माझी चाचणी झाली असून, ती निगेटिव्ह आली असून, मला पॉझिटिव्ह करुन मारण्याची तुमची इच्छा दिसते. 

सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी करायला हवी. परंतु, ते पप्पू यादवशी लढत आहेत. माझ्यासोबत मदत करण्यात आणि जीव वाचवण्यात स्पर्धा करा. मला अडकवून तुरुंगात टाकण्यासाठी वेळ कशासाठी वाया घालवत आहात, असे पप्पू यादव यांनी म्हटले आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com