BJP Politics : विधानपरिषद निवडणूक जिंकलेल्या दोन आमदारांचा 48 तासांत भाजपमध्ये प्रवेश; मुख्यमंत्र्यांच्या डावाने विरोधकाच्या गोटात खळबळ!

Bihar MlC Election News : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरसाठी दोन दिवसांपूर्वीच निवडणुकीचे निकाल समोर आले. यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली.
bjp flag
bjp flagsarkarnama
Published on: 
Updated on: 

New Dehli News : बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक व उत्तरप्रदेशात विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे निकाल समोर आले असून त्यामध्ये भाजपने मोठी मुसंडी जरी मारली असली तरी दुसरीकडे मात्र बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी डाव टाकल्याने विधानपरिषदेच्या दोन अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये सारण मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले राहुल राज आणि तिरहुत पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवलेले बंशीधर ब्रजवासी यांचा समावेश आहे. या दोघांच्या भाजप प्रवेशामुळे आता नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

बिहारमधील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरसाठी दोन दिवसांपूर्वीच निवडणुकीचे निकाल समोर आले. यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपला धक्का बसला आहे. तर अनेक ठिकाणी मित्रपक्षच विरोधात उभे असल्याने देखील भाजपला नुकसान झाले. त्यामुळेच एकीकडे भाजपकडून विजयानंतर जल्लोष तर काही ठिकाणी पराभवानंतर आत्मचिंतन केले जात आहे.

बिहारमधील सारण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूचे उमेदवार आनंद पुष्कर यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या राहुल राज यांना भाजपमध्ये (BJP) प्रवेश दिला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्यापूर्वी राहुल राज यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट घेतली. यावेळी सारणचे भाजप खासदार राजीव प्रताप रुडीही उपस्थित होते.

bjp flag
Maharashtra budget session: सुनेत्रा पवार पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत बोलल्या; म्हणाल्या, 'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढवणे हा अजितदादांचा ध्यास होता'

त्यासोबतच बिहारमधील दुसरे विधान परिषद सदस्य बंशीधर ब्रजवासी आहेत. त्यांनी तिरहुत पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. या निवडणुकीच्या मतमोजणीत बंशीधर ब्रजवासी यांना एकूण 31 हजार 832 मते मिळाली होती. तर एनडीएचे उमेदवार अभिषेक झा यांना 22 हजार 685 मते मिळाली होती. अशा प्रकारे ब्रजवासी यांनी 9 हजार 147 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या दोन अपक्ष आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे आता नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. दोघांच्या प्रवेशाने भाजपचे विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल वाढले आहे.

bjp flag
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.