

Bihar politics news : 'आरजेडी'चे सर्वेसर्वा लालु प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील यादवी काही थांबायला तयार नाही. यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी कोणाचेही नाव न घेता, पुन्हा एकदा 'आरजेडी'चे (RJD) नेते तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावर, महान वारसा धुळीस मिळवण्यासाठी बाहेरील लोकांची गरज नाही, स्वतःचे लोक पुरेसे आहेत, अशी पोस्ट शेअर केली आहे. तेजप्रताप यादव यांना पक्षातून काढून टाकण्यात आलेल्या नाराजीतून रोहिणी आचार्य यांनी हे मत मांडल्याची चर्चा आहे.
रोहिणी आचार्य यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही. मोठ्या प्रयत्नांनी निर्माण झालेल्या आणि स्थापित झालेल्या वारशाला संपविण्यासाठी बाहेरच्यांची गरज नाही. त्यासाठी आपले प्रियजन पुरेसे आहेत. नव्याने झालेले 'आपले आणि जुने असणारे आपले पुरेसे आहेत, असे आचार्य यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
तसंच पुढे लिहिले आहे की, "आपलेच लोक वारशाला ओळख आणि अस्तित्व देणाऱ्यांच्या खाणाखुणा पुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे धक्कादायक आहे. जेव्हा अहंकार डोक्यात जातो, तेव्हा विपरित बुद्धी काम करु लागते. ती डोळे, नाक आणि कान यासारख्या इंद्रियाचा ताबा घेते. अशातून चुकीचे निर्णय घेण्यास ती शक्ती प्रवृत्त करते." सद्सदविवेक बुद्धी जेव्हा संपते तेव्हा, असे घडते,’ असे त्या म्हणाल्या.
बिहार (BIHAR) विधानसभा निवडणुकीत राजदचा पराभव झाल्यानंतर रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडत असल्याचे जाहीर केले आणि कुटुंबाशी संबंध तोडले. मी राजकारण सोडत आहे आणि मी माझ्या कुटुंबाचा त्याग करत आहे. संजय यादव आणि रमीज यांनी मला हेच करण्यास सांगितले होते आणि मी त्याची जबाबदारी घेत आहे, असे रोहिणी आचार्य यांनी नोव्हेंबरमध्ये लिहिले होते.
संजय यादव हे राजदचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि तेजस्वी यादव यांचे सर्वात विश्वासू सहकारी आहेत. रमीज हे तेजस्वीचे जुने मित्र असल्याचे सांगितले जाते, जे उत्तर प्रदेश राज्यातील एका राजकीय कुटुंबातील आहेत. काही वर्षांपूर्वी वडिलांना मूत्रपिंड दान केल्यामुळे चर्चेत आलेल्या आचार्य या लोकसभा निवडणुकीत सारण येथून अपयशी ठरल्या. शिवाय बिहार विधानसभा निवडणुकीत राजदच्या जागांची संख्या 75 वरून 24 वर घसरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.