UP model elections : महाराष्ट्रात ‘बिनविरोध’साठी भाजपचं ‘यूपी’ मॉडेल! 'आप'चे संजय सिंह यांचा घणाघात

AAP MP Sanjay Singh alleges BJP Mahayuti used ‘UP Model’ in Maharashtra Municipal Elections : महाराष्ट्र महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप महायुतीने युपी सरकारचा बिनविरोध माॅडेल राबवल्याचा आम आदमी पक्षाने आरोप केला आहे.
AAP MP Sanjay Singh
AAP MP Sanjay SinghSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra municipal elections : महाराष्ट्रात बिनविरोध निवडून येण्याच्या घटना वाढल्या आहेत; मात्र हे उत्तर प्रदेशचे योगी मॉडेल आहे. उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या सर्वाधिक जागा आल्या.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व अध्यक्ष आपलेच निवडून आणण्याची किमया भाजपने साधली. साम, दाम, दंड, भेद या अस्त्राचा वापर करून भाजपने हे करून दाखवले. याच मॉडेलची पुनरावृत्ती भाजप महाराष्ट्रात करीत आहे, असा आराेप आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला आहे.

आपचे खासदार संजय सिंह महापालिका निवडणुकानिमित्ताने मुंबई (Mumbai) दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली. भाजप निवडणुका द्वेषाचे राजकारण करून जिंकत आहे, असा दावा संजय सिंह यांनी केला.

खासदार संजय सिंह म्हणाले, मुळात मुंबईत संख्याबळानुसार मुस्लिम महापौर होऊ शकत नाही, "हे भाजपला (BJP) चांगलेच ठाऊक आहे. हा मुद्दाच नाही, तरीही जाणीवपूर्वक मुस्लिम महापौरपदाचा मुद्दा काढून भाजप वातावरण तापवत आहे." संविधानाची शपथ घेणारे नेते असे विधान करू शकत नाहीत. विद्वेषाचे राजकारण हेच आता भाजपचे निवडणूक जिंकण्याचे सूत्र झाले आहे, असा आराेप संजय सिंह यांनी केला.

AAP MP Sanjay Singh
AIMIM Politics : ऐन निवडणुकीत एमआयएम काढणार मोर्चा, राजकीय वातावरण तापणार!

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तब्बल नऊ वर्षांनंतर होत आहेत. त्यामुळे मतदारांत निरुत्साह दिसत आहे. राजकीय पक्षांमध्येही फारसा उत्साह नाही. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी केलेली आघाडी-युती तुटली. बहुतांश राजकीय पक्ष स्वबळावर लढत आहेत. या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळेल, असे दिसत नाही. या निवडणुका केवळ स्थानिक समस्या, मुद्द्यांवर लढवल्या जात आहेत, असे संजय सिंह यांनी नमूद केले.

AAP MP Sanjay Singh
Raj Thackeray Nashik speech : राज ठाकरेंनी अचूक नेम धरला, रामभूमीतून भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांवर एकाचवेळी बाण सोडले..

'आप' मुंबईत खाते खोलणार!

2014नंतर आम आदमी पक्षाचे उमेदवार मुंबई पालिका लढत आहेत. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन मतदारांनी कामावर आधारित राजकारण करण्याचे आवाहन त्यांनी केले. वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा शहरातील मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित करून आम आदमी पक्षाने या वेळी 63 उमेदवार मैदानात उतरवले आहेत. या वेळी पालिकेत आमच्या पक्षाचे खाते खुलेल, असा दावा संजय सिंह यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com