Nitish Kumar news : पहिल्यांदाच आमदार, पण स्वागताला पत्नी नव्हती; नितीश कुमारांनी थेट सासर गाठलं अन्...

Old Political Stories from Bihar Assembly : नितीश कुमार 1985 मध्ये पहिल्यांदाच आमदार बनले होते. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर ते त्यांचे गाव असलेल्या बख्तियारपूरमध्ये आले होते.
"Nitish Kumar’s early political journey in Bihar Assembly, rare political anecdotes remembered."
"Nitish Kumar’s early political journey in Bihar Assembly, rare political anecdotes remembered."Sarkarnama
Published on
Updated on

Bihar Politics : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणातील अनेक किस्से सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जनतेच्या मनातील सर्वाधिक पसंतीचे नेते म्हणून स्थान मिळवले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी, त्यांच्या कुटुंबाविषयी, राजकीय वारसा, राजकारणातील चढऊतार याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. असाच एक किस्सा त्यांच्या पत्नी मंजू सिन्हा यांच्याशी संबंधित आहे.

नितीश कुमार यांनी तब्बल नऊवेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही त्यांनी पुन्हा एकदा कंबर कसली असून त्यांच्या संयुक्त जनता दलाकडून त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले जात आहे. ते दहाव्यांदा शपथ घेणार की नाही, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

नितीश कुमार 1985 मध्ये पहिल्यांदाच आमदार बनले होते. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर ते त्यांचे गाव असलेल्या बख्तियारपूरमध्ये आले होते. त्यांच्या समर्थकांसह नातेवाईक व मित्रमंडळींकडून जोरदार स्वागत करण्यात आले होते. पण या स्वागतामध्ये त्यांची पत्नी मात्र नितीशकुमार यांना दिसली नाही.

"Nitish Kumar’s early political journey in Bihar Assembly, rare political anecdotes remembered."
Mysuru Dasara Row : ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे उद्घाटन करणार मुस्लिम महिला; सरकारने लावली ताकद, हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब

नितीश कुमार यांच्या पत्नी मंजू या आपल्या माहेरी म्हणजे सेवदह या गावी गेल्या होत्या. बख्तियारपूर आणि सेवदहमधील अंतर 40 किलोमीटर इतके आहे. पत्नी माहेरी गेल्याची माहिती नितीश कुमार यांच्यापर्यंत पोहचली होती. पण आमदारकीनंतर होत असलेल्या स्वागतामुळे त्यांना लगेच तिथून बाहेर पडता आले नव्हते.

विजयाचा जल्लोष संपल्यानंतर नितीश कुमार यांनी मध्यरात्रीच सासरी जाण्याचा निर्णय घेतला. पत्नीला भेटण्यासाठी जायचे आहे, असे एका मित्राला सांगितले अन् दोघे दुचाकीवर निघाले. पहाटेच्या सुमारास ते सासरी पोहचले. आमदारकीनंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे ते सासरी आले होते. हे पाहून सर्वजण अवाक झाले होते. तर पत्नी मंजू यांनाही खूप आनंद झाला होता. नितीश कुमार यांचा हा किस्सा अनेकांकडून सांगितला जातो.

"Nitish Kumar’s early political journey in Bihar Assembly, rare political anecdotes remembered."
Bihar Election Survey : राहुल गांधींच्या यात्रेनंतरच्या सर्व्हेने वाढवले सर्वांचेच टेन्शन; ‘ते’ मतदार दाखवणार हिसका...

नितीश कुमार याचे महाविद्यालयीन मित्र उदय कांत यांच्या ‘नितीश कुमार : अंतरंग मित्रांच्या नजरेतून’ या पुस्तकामध्ये नितीश कुमार यांच्याविषयीचे असे अनेक किस्से आहेत. नितीश कुमार यांनी पत्नी मंजू यांना लग्नाच्या आधी पहिल्यांदा मंडपात पाहिले होते. त्यांचा विवाह कुटुंबानेच ठरवला होता.

1967 मध्ये पटना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश केल्यानंतर अखेरच्यावर्षी कुटुंबायांनी मंजू सिन्हा यांच्यासोबत त्यांचा विवाह ठरवला. मंजू या पटना येथील मगध महिला महाविद्यालयामध्ये त्यावेळी शिकत होत्या. कुटुंबाने 22 हजार रुपये हुंडा देण्याच्या अटीवर लग्नाला होकार दिला होता. पण नितीश कुमार यांनी त्याला विरोध केला होता. मंजू यांच्या कुटुंबालाही त्यांनी आपण हुंडा घेणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com