Donald Trump News : ट्रम्प यांची भारताला डिवचणारी धक्कादायक घोषणा; ‘पाक’ला नडणाऱ्या संघटनेला लावला ‘दहशतवादी’ टॅग

US Declares Balochistan Liberation Army a Terrorist Group : अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दोन दिवसांपूर्वीच भारताला आण्विक हल्ल्याची धमकी दिली होती.
The US Department of State declares the Balochistan Liberation Army and its Majeed Brigade as a Foreign Terrorist Organization.
The US Department of State declares the Balochistan Liberation Army and its Majeed Brigade as a Foreign Terrorist Organization. Sarkarnama
Published on
Updated on

India Vs Bakistan update : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मागील काही महिन्यांपासून सातत्याने भारतविरोधी भूमिका घेतली जात आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेताना ते मागेपुढे पाहताना दिसत नाहीत. पाकचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासाठी व्हाईट व्हाऊसमध्ये खास मेजवानीचे आयोजन, भारतावर ५० टक्के टेरिफ, रशियाकडून तेल घेण्याला विरोध अशा अनेक बाबतीत ट्रम्प यांनी भारताला लक्ष्य केले आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी भारताला डिवचले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तानला भिडणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. पाकसाठी हे जमेची बाजू ठरली आहे. विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूरनंतर या संघटनेने आनंद व्यक्त करत भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला होता.

बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्यासाठी ही संघटना मागील काही वर्षांपासून संघर्ष करत आहे. या संघटनेला भारतालाही हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. आता ट्रम्प यांनी याच संघटनेला दहशतवादी संघटनेचे लेबल लावत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानवर मेहेरबानी केली आहे.

The US Department of State declares the Balochistan Liberation Army and its Majeed Brigade as a Foreign Terrorist Organization.
Justice Verma Case : अखेर न्यायमूर्ती वर्मा यांचा मुद्दा लोकसभेत आलाच; ओम बिर्लांचा मोठा निर्णय, तिघांवर जबाबदारी

लष्करप्रमुख मुनीर हे अमेरिकेत असताना ट्रम्प यांनी ही घोषणा केल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर मुनीर यांनी मागील दोन महिन्यांतील ही दुसरी अमेरिकावारी आहे. बलुच आर्मीला दहशतवादाचा टॅग लागल्याने आता पाकिस्तानकडून आपणही दहशतवादाचे बळी ठरत असल्याचे जागतिक पातळीवर सांगितले जाईल. आपल्यावरील दहशतवादी राष्ट्राचा भारताने लावलेला टॅग पुसण्यासाठी मुनीर सक्रीय झाल्याचे दिसते. त्यासाठी ट्रम्प यांच्याकडूनही मदतीचा हात पुढे केला जात आहे.

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या मुनीर यांनी दोन दिवसांपूर्वीच भारताला आण्विक हल्ल्याची धमकी दिली होती. शांततेचे नोबेल मिळण्याची इच्छा व्यक्त करत असलेल्या ट्रम्प यांच्या देशाच्या मातीतून हा गर्भित इशारा मुनीर यांनी दिला आहे. पण त्यावर अजूनही अमेरिका प्रशासनाकडून काहीही भाष्य करण्यात आलेले नाही.

The US Department of State declares the Balochistan Liberation Army and its Majeed Brigade as a Foreign Terrorist Organization.
Election News : भाजपचे दोन बडे नेते एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; मोदी, राहुल गांधीही आहेत मतदार...

मुनीर यांच्या विधानावर भारताने जोरदार आक्षेप घेतला होता. तिसऱ्या देशाच्या मातीतून हा असे विधान करणे खेदजनक असल्याचे भारताने म्हटले होते. त्यानंतर दोन दिवसांतच ट्रम्प यांनी बलूच संघटनेवर दहशतवादाचा टॅग लावत पाकिस्तानला हवे तेच केले आहे. त्यामुळे ट्रम्प यांचे पाकिस्तान प्रेम पुन्हा समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com