Debashish Samantaray : खासदारकीचा तडकाफडकी राजीनामा, माजी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू नेत्याचा काही तासांतच भाजपमध्ये प्रवेश

BJD MP BJP entry : देवाशीष सामंतराय यांच्याआधी सुजीत कुमार ममता महंता या दिग्गज नेत्यांनीही खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Debashish Samantaray joins BJP
Debashish Samantaray joins BJPSarkarnama
Published on
Updated on

BJP politics : पश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्ता काबीज केल्यानंतर काही दिवसांतच शेजारीत ओडिशा राज्यात मोठा राजकीय धमाका झाला आहे. बिजू जनता दलाचे मातब्बर नेते खासदार देवाशीष सामंतराय यांनी सोमवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही तासांतच त्यांनी मंगळवारी सकाळी भाजपमध्ये प्रवेश करत बीजेडीला जोरदार झटका दिला आहे.

सामंतराय हे ओडिशातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते मानले जातात. बीजेडीचे प्रमुख माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे ते अत्यंत विश्वासू नेते मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाने पटनायक यांनाही धक्का बसला आहे. सामंतराय हे आतापर्यंत दोनवेळा विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. तर २०२४ मध्ये त्यांना पटनायक यांनी राज्यसभेवर पाठविले होते. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २०३० मध्ये संपणार होता. पण आधीच त्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.

बीजेडीच्या सदस्यत्वाचाही सामंतराय यांनी पटनायक यांना पत्र लिहून सोमवारीच राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सोपविला होता. सामंतराय यांनी पटनायक यांना लिहिलेल्या पत्रात लक्षात आपला सातत्याने अपमान होत असल्याची नाराजी व्यक्त केली होती. तसेच आपल्या कामाची दखल घेतली जात नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पक्षात आपल्याला कमी लेखले जात होते, असे सांगत सामंतराय यांनी पटनायक यांचे विश्वासू सहकारी आणि माजी आयएएस अधिकारी व्ही. के. पांडियन यांच्यावरही निशाणा साधला. पक्षाला काही बाहेरील लोकांनी हायजॅक केले आहे. खासदार असूनही आपल्याच पक्षाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांना भेटूही दिले जात नसल्याचा आरोप सामंतराय यांनी केला आहे.

सामंतराय यांच्याआधी सुजीत कुमार ममता महंता या दिग्गज नेत्यांनीही खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते भाजपच्या तिकीटावर पुन्हा राज्यसभेत दाखल झाले आहेत. सामंतराय हे बीजेडी सोडून भाजपमध्ये जाणारे तिसरे खासदार ठरले आहेत. त्यामुळे आता बीजेडीच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या पाचपर्यंत खाली आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com