BJP Political news : देशातील आणखी एक पक्ष फुटला; मित्रपक्षाचेच आठ आमदार भाजपच्या गळाला, रात्रीत फिरली चक्रं

Meghalaya UDP, UDP MLAs join BJP, Meghalaya BJP, eight UDP MLAs : मेघालयातील यूडीपीचे आठ आमदार भाजपमध्ये; दहाच्या संख्याबळासह भाजप दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष, यूडीपीचा आकडा चारवर.
Eight United Democratic Party MLAs have joined the BJP in Meghalaya.
Eight United Democratic Party MLAs have joined the BJP in Meghalaya.Sarkarnama
Published on
Updated on

UDP MLAs join BJP : मागील काही वर्षांत देशातील विविध पक्षांचे आमदार आणि खासदारांच्या पक्षांतराचा धडाका सुरू आहे. त्यामध्ये मंगळवारी आठ आमदारांची भर पडली. मेघालयातील यूनायटेड डेमोक्रेटिक पार्टीच्या (UDP) आठ आमदारांनी बुधवारी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भाजप राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष बनला आहे.

मेघालयमध्ये सध्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या नेतृत्वाखालील मेघालय डेमोक्रॅटिक आघाडीचे सरकार असून यूडीपीसह भाजपही या आघाडीत आहे. भाजपचे विधानसभेत दोन आमदार होते. आता आठ आमदारांचा पक्षप्रवेश झाल्याने भाजपकडील आमदारांचे संख्याबळ दहावर पोहोचले आहे. तर यूडीपीचे संख्याबळ १२ वरून चारपर्यंत खाली घसरले आहे.

यूडीपी हा पक्ष विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होता. पण भाजपने आठ आमदार फोडत पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. राज्यातील तृणमूल काँग्रेसचे सर्व चार आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, सध्यातरी यूडीपीच्या आमदारांनी भाजपची वाट धरली आहे.

Eight United Democratic Party MLAs have joined the BJP in Meghalaya.
Election Commission news : दोन निवडणूक आयुक्तांचे 'हे' आहेत 14 धक्कादायक आक्षेप; नवीन मतदार नोंदणीसाठीचा फॉर्म 6 वादात...

अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी यूडीपीच्या १२ पैकी आठ आमदारांना स्वतंत्र गट करणे अपेक्षित होते. त्यानुसार या आठ आमदारांकडून मागील काही दिवसांपासून भाजपसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याचे समोर आले होते. अखेर त्यावर तोडगा निघाला आणि सोमवारी मंगळवारी रात्री सर्व चक्रं फिरली आणि बुधवारी सकाळी पक्षप्रवेशही झाला.

Eight United Democratic Party MLAs have joined the BJP in Meghalaya.
Supreme Court news : शिवसेना प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाने वाढली धडधड; मतदारांचा मुद्दा ठरणार महत्वाचा, नेमका अर्थ काय?

यूडीपीच्या आमदारांनी काही दिवसांपूर्वीच FCRA कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याचा दावा केला होता. मात्र, ही भेट पक्षप्रवेशाची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपकडून एफसीआरए कायद्याची अंमबजावणी न करण्याबाबतही या आमदारांना आश्वासन दिल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com