Up Election 2027 : 'यूपी'साठी भाजपची मोठी घोषणा! निवडणुकीआधीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर; राष्ट्रीय अध्यक्षांनी नावचं सांगितलं

Nitin Nabin Confirms Yogi Adityanath Leadership For Upcoming UP Assembly Elections : उत्तर प्रदेशमध्ये पुढच्यावर्षी विधानसभा निवडणूक होणार असून आतापासून राजकीय हालचाली आणि मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
BJP Nitin Nabin  .jpg
BJP Nitin Nabin .jpgSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजपने 2027 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथ यांनाच चेहरा म्हणून घोषित केले आहे.

  2. पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी याबाबत स्पष्ट वक्तव्य करत नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

  3. निवडणुकीपूर्वीच राजकीय हालचाली आणि रणनीतीला वेग आला आहे.

Uttar Pradesh Assembly Election 2027 : देशातील विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसोबतच पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) आणि तामिळनाडूमध्ये मतदान चुरशीनं झालं आहे. पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता असा दावा भाजप करत आहे. अशातच पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली आहे. त्या पार्श्वभूमिवर भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी मोठी घोषणा केली असून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलं आहे. भाजप अध्यक्ष नवीन यांनी “योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असून त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे. त्यामुळेच तेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील” असे म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पुढच्यावर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी आतापासून राजकीय हालचाली, मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. समाजवादी पक्षाने दादरी येथून मिशन 2027 घोषणा करत प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर भाजपने देखील रणनीती आखत आता पत्ते उघड करण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या आधीच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावरून चर्चांना उधाण आले असतानाच आता भाजपने याची घोषणाच करून आघाडी घेतली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन यांनी एका हिंदू न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात एक मोठे विधान केले आहे. त्यांनी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलय की, “योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे. त्यामुळेच निश्चितच ते चेहरा असतील”. त्यांच्या या घोषणेमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून तेच भाजपकडून मुख्यमंत्रींचा चेहरा असतील.

BJP Nitin Nabin  .jpg
BJP President Nitin Nabin : भाजप अध्यक्षांची संसदेत एन्ट्री होणार? मंत्रिपद, आमदारकीचा राजीनामा अन्... काय असेल प्लॅन?

नितीन नवीन यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात 2027 विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच उत्तर प्रदेशात भाजपं सत्तेची हॅटट्रिक करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

भाजप अध्यक्ष नवीन यांना या मुलाखतीत यूपी आणि उत्तराखंडमध्ये सीएम योगी आणि धामी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील का? असा सवाल करण्यात आला होता. यावर उत्तर देताना अध्यक्ष नवीन यांनी, मुख्यमंत्री योगी हेच निश्चितपणे चेहरे असतील, असे म्हणाले.

तसेच ज्या उत्तर प्रदेशची ओळख ही एकेकाळी खंडणी आणि गुन्हेगारीसाठी होती. ती आता सुधारित कायदा आणि सुव्यवस्था आणि द्रुतगती मार्गांमध्ये बदलली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री योगी उत्तर प्रदेशला एक उत्तम राज्य बनवत आहेत. ते कौतुकास्पद आहे.

BJP Nitin Nabin  .jpg
Nitin Nabin : भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचा विरोधकांना पहिला टोला अन् कार्यकर्त्यांना खास संदेश...

FAQs :

1. यूपी निवडणुकीत भाजपचा चेहरा कोण असणार?
योगी आदित्यनाथ हेच भाजपचा चेहरा असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

2. ही माहिती कोणी दिली?
भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी मुलाखतीत ही माहिती दिली.

3. निवडणूक कधी होणार आहे?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 मध्ये होणार आहे.

4. भाजपची रणनीती काय आहे?
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची रणनीती आहे.

5. याचा राजकारणावर काय परिणाम होईल?
यामुळे राजकीय वातावरण तापण्याची आणि इतर पक्षांच्या हालचाली वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com