Gokul latest news : सतेज पाटील पुन्हा कंडका पाडणार; मुश्रीफांसह सर्व विरोधकांचा डाव उधळून लावण्यासाठी उचललं मोठं पाऊल...

Gokul Chairman Election, Satej Patil, Shashikant Patil Chuyekar, Gokul Milk Union News : समविचारी आघाडीच्या संचालकांनी बहुमताच्या जोरावर समांतर सभा घेत शशिकांत पाटील चुयेकर यांच्या अध्यक्षपदाची घोषणा केली होती.
Gokul Dudh Sangh : Hasan Mushrif Vs Satej Patil
Gokul Dudh Sangh : Hasan Mushrif Vs Satej Patil Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत कोरम पूर्ण होत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी अध्यक्ष निवडीसाठी नकार दर्शविला. त्यानंतर समविचारी आघाडीकडून समांतर सभा घेत बहुमताच्या जोरावर शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदाची निवड जाहीर केली. मात्र त्याला कायदेशीर अधिकार आहे का नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, गोकुळ मधील सत्ता संघर्षाच्या निर्माण झालेल्या पेचात अडकलेल्या समविचारी आघाडीने अध्यक्षपदासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. गोकुळ दूध संघात सत्ता आल्यानंतर समांतर सभा घेऊन अध्यक्ष म्हणून शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड केल्यानंतर समविचारी आघाडीच्या 13 संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे.

गोकुळच्या बैठकीला कोरमची गरज नाही, आमच्याकडे बहुमत आहे. यामुळे आम्ही अध्यक्ष निवडू शकतो, आम्ही निवडलेला अध्यक्ष कायदेशीर असल्याचा दावा याचिकेत केला आहे. दुपारी अडीच वाजता सर्किटबेंच समोर याची सुनावणी होणार असल्यामुळे जिल्ह्याचं लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

Gokul Dudh Sangh : Hasan Mushrif Vs Satej Patil
IAS अधिकाऱ्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात; भाजपकडून पंचायत समितीसाठी उमेदवारी

अध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी गोकुळ शिरगाव येथे 25 संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यादेखील उपस्थित होत्या. समविचारी आघाडीचे 13 तर महायुतीकडे बारा संचालक आहेत. मात्र सभेच्या गणपूर्तीसाठी 14 संचालक उपस्थित असणे गरजेचे आहे.

Gokul Dudh Sangh : Hasan Mushrif Vs Satej Patil
वडिलांची राहुल गांधींशी हातमिळवणी; भाजपमधील माजी खासदार लेकीवर संशयाची सुई...

महायुतीच्या बारा संचालकांनी अनुपस्थिती लावल्याने सभा तहकूब करावी लागली. त्यामुळे अधिकृतरित्या अध्यक्ष निवड झाली नाही. त्यामुळे समविचारी आघाडीच्या संचालकांनी बहुमताच्या जोरावर समांतर सभा घेत शशिकांत पाटील चुयेकर यांच्या अध्यक्षपदाची घोषणा केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.