

पिंपरी : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून त्यात विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दिला आहे. लोकसभेत बहुमत असल्याने भाजपला चिंता करण्य़ाची गरज नाही. तरी सावधगिरी घेत आपल्या खासदारांसाठी त्यांनी आज व्हीप जारी केला. त्यातून हा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्याचा त्यांचा इरादा आहे.
विरोधी पक्षांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी दाखल करून घेतला आहे. तो पुढील आठवड्यात सदनात ८ ते १० तारखेदरम्यान चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. म्हणून पुढील आठवड्यातील कामकाजाच्या पाचही दिवसांसाठी (ता.७ ते ११) भाजपने आपल्या खासदारांसाठी हा व्हीप बजावला आहे. त्यामुळे त्यांना पुढील आठवडा लोकसभेत उपस्थित रहावे लागणार आहे.
यातून भाजप कसलाही धोका पत्करायला तयार नसल्याचे दिसून आले आहे. तसेच विरोधकांना दिल्लीच्या संदर्भातील विधेयकानंतर पुन्हा एकदा अस्मान लोकसभेत दाखविण्याची तयारी त्यांनी सुरु केल्याचे बोलले जात आहे. मणिपूरमधील हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत निवेदन करावे, या मागणासाठी विरोधकांनी सभागृहाचे कामकाज गुरूवारपर्यंत होऊ दिले नव्हते.
त्यात व्यत्यय आणून गोंधळ घालून ते बंद पाडले होते. त्याचा काहीसा वचपा सत्ताधारी भाजपने राज्यसभेत आज काढला. विरोधी पक्षनेते काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेत बोलायला उभे राहताच सत्ताधारी खासदारांकडून त्यात अडथळा आणण्यात आला. गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे खर्गे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.