Kolhapur Expansion: कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी आमदार जयश्री जाधव आक्रमक; आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले

Jayashree Jadhav News: कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी शुक्रवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
Jayashree Jadhav
Jayashree Jadhav Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी शुक्रवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नासंदर्भात अनेकदा चर्चा झाली, मात्र, 1972 पासून आत्तापर्यंत हा प्रश्न सुटलाच नाही. यावरूनच कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यानंतर जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या. त्यांनी आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर नवख्या असल्याने विधानसभेत विशेष प्रश्न विचारले नव्हते. मात्र, या अधिवेशनात त्यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न लावून धरला. या प्रश्नासाठी त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर फलक झळकवून सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले.

Jayashree Jadhav
Pimpri - Chinchwad Politics : भाजपच्य़ा बाळा भेगडेंचा स्वपक्षीय आमदार लांडगेनंतर आता शिवसेनेच्या खासदार बारणेंनाही 'खो'

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना कोल्हापूरची हद्दवाढ करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी हद्दवाढी संदर्भात हालचालीही सुरु झाल्या होत्या. मात्र, नंतर काहीच झाले नसल्याने आमदार जाधव अधिवेशनादरम्यान आक्रमक झाल्या.

1972 पासून शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. हद्दवाढीला शेजारच्या गावांचा विरोध आहे. मात्र, हद्दवाढ झाल्याशिवाजी शहराची प्रगती होणार नाही, त्यामुळे हद्दवाढ करावी, अशी मागणीच विधानसभेत जयश्री जाधव यांनी केली. आता त्यांच्या या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेत, हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com