
Bihar’s Cultural and Political Influence : बिहार विधानसभेची निवडणूक वर्षअखेरीस होणार असून त्याआधी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात हिंदी-मराठी भाषेचा मुद्दा तापलेला आहे. प्रामुख्याने उत्तर भारतातील राज्यांतील नेत्यांकडून या वादावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. बिहारचे राजकारणही आता मुंबईचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाताना दिसत नाही.
भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना डिवचताना मुंबईचा उल्लेख केला आहे. मालवीय यांनी सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये बिहारी लोकांचा झेंडा मुंबईपासून लंडनपर्यंत फडकत आहे, असे म्हटले आहे.
तेजस्वी यादव यांच्या शिक्षणावरून मालवीय यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, तेजस्वी यादव यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘सचिन तेंडूलकरपासून प्रेरित होऊन क्रिकेट खेळायला लागलो आणि इयत्ता नववीतच शिक्षणाची आवड संपली.’ असंच झाले असेल, असं एक क्षण मानू. पण प्रश्न हा आहे की, आपण तेंडूलकर बनू शकत नाही, त्यांच्याजवळही जाऊ शकत नाही, याची जाणीव झाल्यानंतर शिक्षण पूर्ण का केले नाही, असा सवाल मालवीय यांनी केला आहे.
बिहारमधील सर्वसामान्य युवक शिक्षणाच्या जीवावर कलेक्टर, डॉक्टर, इंजिनिअर आणि प्रशासकीय अधिकारी बनत आहेत. बिहारी लोकांचा झेंडा मुंबईपासून लंडनपर्यंत फडकत आहे. तिथे एक असा व्यक्ती ज्याचे आई-वडील मुख्यंमत्री होते, जर तो नववी पास होऊ शकत नसेल तर हा केवळ शिक्षणाचा अपमान नाही तर बिहारमधील आशावादी युवकांचाही अपमान आहे, अशी टीका मालवीय यांनी केली आहे.
मालवीय यांनी पुढे म्हटले आहे की, असे लोक, त्यांच्याकडे सर्व सोयीसुविधा असतानाही पायाभूत शिक्षणही पूर्ण करू शकत नाही, ते बिहारमधील मेहनती आणि महत्वाकांक्षी युवकांच्या आशा आणि संघर्षाला समजू शकतात का, सवाल मालवीय यांनी केला आहे. बिहार आता बदलला आहे. आता जंगलराजचा वारसा नाही तर शिक्षण आणि संघर्षाचे यश बोलते, असेही मालवीय म्हणाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.