तुमच्यासारख्या पत्रकाराला कळू नये, हे मोठं दुर्दैव! चंद्रकांतदादांचं वक्तव्यातील व्यंगावर बोट

संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात गोवा निवडणुकीवरून चांगलीच जुंपली आहे.
Chandrakant Patil-Sanjay Raut
Chandrakant Patil-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर वार-पलटवार करत दोघांनी निशाणा साधला आहे. राऊतांनी गोव्यात विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) उभे राहावे, असे आव्हान पाटील यांनी दिलं होतं. त्यावर राऊतांनी सगळीच येड्यांची जत्रा असं ट्विट करत टीका केली. आता चंद्रकांतदादा यांनीही या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

पाटील यांच्या या आव्हानावर राऊतांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'सगळीच येड्यांची जत्रा : संजय राऊत यांनी गोव्यात जाऊन निवडणूक लढवावी. इति चंद्रकांत पाटील.. कोणत्याही विधानसभेमध्ये निवडणूक लढवायची असेल तर त्या राज्याच्या मतदार यादीत मध्ये नाव असणे गरजेचे असते, एवढे भाजप नेत्यांना माहिती नाही, याचे आश्चर्य वाटते. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो,' असं राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Chandrakant Patil-Sanjay Raut
सगळीच येड्यांची जत्रा; चंद्रकांतदादांच्या आव्हानाची राऊतांनी काढली हवा

त्यावर पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. पाटील यांनी याबाबत ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, संजय राऊत यांचे नाव महाराष्ट्राच्या यादीत आहे, पण महाराष्ट्रातही त्यांची निवडणुक लढवण्याची हिंमत कधी झाली ? माझ्या वक्तव्यातील व्यंग कळू नये, हे तुमच्यासारख्या पत्रकारासाठी मोठं दुर्दैव आहे. पण असो इतर राज्यांतील उमेदवारांचे डिपॉझिट जमा होईल या तणावात होत असेल कदाचित. लवकर बरे व्हा, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना पाठिंब्याची चर्चा करण्यापेक्षा हिंमत असेल तर राऊत यांनी स्वत: गोवा विधानसभा निवडणुकीला उभे राहावे, असे आव्हान पाटील यांनी दिले होते. दरम्यान, मंगळवारी माध्यमांशी बोलताना राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडला. भाजपचे नेते मनोहर पर्रिकरांच्या मुलाचा अपमान करत आहेत. आम्ही जेव्हा म्हटलं की, उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिले तर आम्ही मदत करू. त्यानंतर त्यांची धावपळ सुरू झाली. मी राजकीय बोलत नाही. गोव्यात भाजप जे दिसत आहे, ते मनोहर पर्रिकर यांच्यामुळे ओळखली जाते, असे राऊत म्हणाले.

ज्या विधानसभा मतदारसंघाचे मनोहर पर्रिकर यांनी प्रतिनिधित्व केलं, त्या मतदारसंघात एका माफियाला तिकीट दिलं जात असल्याचे ट्विट उत्पल पर्रिकर यांनी केलं होतं. त्यांना उमेदवारी द्यावीच लागेल. एखाद्या नेत्याविषी, कुटुंबाबद्दल सहानुभूती असते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. गोव्यातही ही परंपरा असावी. त्यामुळे माझ्या भुमिकेला अनेकांनी पाठिंबा दिला आहे, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com