Mamata Banerjee News : बंगालमध्ये निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का? मातब्बर नेता पत्नीसह ममतांना भेटला...

Impact on Bengal Assembly Election Strategy : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
Mamata Banerjee and Dilip Ghosh
Mamata Banerjee and Dilip GhoshSarkarnama
Published on
Updated on

West Bengal Politics : पश्चिम बंगालमध्ये भाजपचे नेते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसवर नेहमीच हल्लाबोल करत असतात. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधून विस्तवही जात नाही. अशातच भाजपच्या एका बड्या नेत्याने पत्नीसह ममतादीदींची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या इतर नेत्यांनीही उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यापार्श्वबूमीवर भाजपचे नेते दिलीप घोष यांनी बुधवारी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रिंकू घोष याही उपस्थित होते. या भेटीनंतर घोष पती-पत्नी तृणमूलमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Mamata Banerjee and Dilip Ghosh
Pakistan ISI : पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; मध्यरात्री ISI प्रमुखांवर सोपवली सर्वात मोठी जबाबदारी

घोष हे बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष तसेच माजी खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचे लोकसभेचे तिकीट कापण्यात आले होते. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, पक्षाच्या कार्यक्रमात ते सक्रीय आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या रिंकू यांच्यासोबत विवाह केल्याने ते चर्चेत आले होते.

घोष पत्नी-पत्नीने बुधवारी दिघा येथील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या श्रीजगन्नाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी तिथे ममता बॅनर्जीही होत्या. त्यानंतर दोघांची भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांच्या फेसबूक पेजवरून लाईव्ह दाखविण्यात आला. त्यामुळे हा व्हिडीओ तसेच भेटीचे फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. ममता बॅनर्जी यांनी घोष यांच्यासह इतर नेत्यांनाही मंदिरात येण्याचे आमंत्रण दिले होते.

Mamata Banerjee and Dilip Ghosh
Political Strike : पाकिस्तानवर हल्ल्याआधीच मोदींकडून भारतातच ‘पॉलिटिकल स्ट्राईक’

दरम्यान, घोष यांनी मीडियाशी बोलताना पक्ष बदलण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ते म्हणाले, लाखो लोक अयोध्येतील राम मंदिरात का जातात? ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या नेत्यांना कुंभमेळ्यात जाण्यापासून रोखले नव्हते का, तरीही काही जण गेले. त्यांनी काही गुन्हा केला का? मंदिर कुणी बनवले हे महत्वाचे नाही. लोक तिथे देवाच्या पुजेसाठी जातात.

टीएमसीमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर ते म्हणाले, मी का जाऊ? निवडणुकीवेळी इतर लोक करतात तसे मी मागील दहा वर्षांपासून पक्ष बदललेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. घोष यांच्या भेटीनंतर मात्र भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. भाजप नेते स्वपन दासगुप्ता म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांमध्य या कथित विश्वासघाताविषयी आक्रोश आहे. राष्ट्रीय नेतृत्व त्याला पाठिशी घालणार नाही.

Mamata Banerjee and Dilip Ghosh
India Vs Pakistan : पाकिस्तानी नागरिकांना मोदी सरकारकडून मोठा दिलासा; गृह मंत्रालयाचा नवा आदेश

राज्य भाजपचे अध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, दिलीप घोष यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. पक्षाने या दौऱ्याचे समर्थन केलेले नाही. अनेक आमदारांनाही बोलावण्यात आले होते. पण राज्यात हिंदूंवर होत असलेला अन्याय पाहून तिथे न जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुजूमदार यांनी सांगितले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com