Pakistan ISI : पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; मध्यरात्री ISI प्रमुखांवर सोपवली सर्वात मोठी जबाबदारी

Pakistan Appoints ISI Chief Asim Malik as National Security Advisor : पाकिस्तानकडून चीन, अमेरिकेसह इतर देशांसमोर हात पसरण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
Lt. Gen. Mohammed Asim Malik, newly appointed National Security Advisor of Pakistan
Lt. Gen. Mohammed Asim Malik, newly appointed National Security Advisor of Pakistan Sarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताचा चांगलाच धसका घेतला आहे. भारताकडून कधीही हल्ला होऊ शकते, या भीतीने पाक खडबडून जागे झाले आहे. भारताने आधीच सिंधू जलकरार रद्द केला आहे. पाकच्या विमानांसाठी भारताची हवाई हद्दही बंद केली आहे. पाकच्या नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आता. आता भारताकडून हल्ला होऊ शकतो, या भीतीने पाककडून पावले टाकण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

पाकिस्तानकडून चीन, अमेरिकेसह इतर देशांसमोर हात पसरण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आता पाक मध्यरात्रीत एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या इतिहासात आतापर्यंत असे कधीच घडले नव्हते. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआय च्या प्रमुखांवर सर्वात मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Lt. Gen. Mohammed Asim Malik, newly appointed National Security Advisor of Pakistan
Political Strike : पाकिस्तानवर हल्ल्याआधीच मोदींकडून भारतातच ‘पॉलिटिकल स्ट्राईक’

आयएसआयचे प्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यरात्रीच त्याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे. मलिक यांच्यावर ही अतिरिक्त जबाबदारी असून ते दहावे सल्लागार ठरले आहेत. आयएसआयचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एकाच व्यक्तीकडे देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारताकडून हल्ला होण्याची भीतीने पाकिस्ताने तातडीने ही नियुक्ती केली आहे. यावरून मलिक यांच्यावरील पाकिस्तान किती विसंबून आहे, हे स्पष्ट झाले आहे. भारताकडून हल्ला झाल्यास किंवा त्याआधीच त्यातून मलिक मार्ग काढू शकतात, असे पाकिस्तानला वाटत असावे, अशी चर्चा आहे. एनएसएचे पद मागील तीन वर्षांपासून रिक्त होते. त्यावेळी मोईद यूसुफ प्रमुख सल्लागार होते. इम्रान खान यांची सत्ता गेल्यानंतर यूसुफ यांनाही पदावरून हटविण्यात आले होते.

Lt. Gen. Mohammed Asim Malik, newly appointed National Security Advisor of Pakistan
India Vs Pakistan : पाकिस्तानी नागरिकांना मोदी सरकारकडून मोठा दिलासा; गृह मंत्रालयाचा नवा आदेश

दरम्यान, भारताने सर्वप्रकारच्या पाकिस्तानी विमानांची आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय बुधवारी रात्रीच घेतला आहे. त्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे. तर पाकिस्तानने यापूर्वीच भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अतिशय आक्रमक पवित्रा घेतल्याने पाकिस्तान हादरले आहे. दहशतवादी आणि त्यांच्या आकाला ते विचारही करू शकणार नाहीत, अशी शिक्षा देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तान चांगलेच हादरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com