Om Birla : संसदेत शपथ घेतल्यानंतर 'जय हिंदू राष्ट्र' म्हणता येणार नाही; लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय!

Om Birla Reinstatement Oath Process : एआयएमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेताना जय पॅलेस्टिन घोषणा दिली होती. त्यांच्या जय पॅलिस्टिनच्या घोषणेमुळे वाद झाला होता.
Om Birla
Om Birlasarkarnama

Om Birla News : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांनी शपथ घेणाच्या नियमात महत्त्वाचा बदल केला आहे. शपथ घेतल्यानंतर सदस्य जी घोषणा देतात ती घोषणा त्यांना देता येणार नाही. जेवढी शपथ आहे तेवढीच सदस्यांना घेता येणार आहे. त्यानंतर त्यांना घोषणा किंवा वेगळे काही बोलता येणार नाही. सदस्यांनी शपथ घेतल्यानंतर जय भीम, जय संविधान, जय पॅलेस्टीन, जय हिंदू राष्ट्र अशा घोषणा देता येणार नाही.

एआयएमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेताना जय पॅलेस्टिन घोषणा दिली होती. तसेच त्यांनी जय भीम जय संविधानचा नारा देखील दिला होता. मात्र, त्यांच्या जय पॅलिस्टिनच्या घोषणेमुळे वाद झाला होता.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला Om Birla लोकसभेतील प्रक्रिया आणि कामकाजाचे नियम 389 मध्ये दुरुस्ती केली आहे. त्यानुसार शपथ घेण्याचे जे प्रारुप आहे त्यानुसारच सदस्याला शपथ घेता येणार आहे. शपथेच्या प्रारुपामध्ये असलेल्या शब्दांच्या व्यतिरिक्त कोणतेही शब्द सदस्यांना बोलता येणार नाहीत. तसेच कोणती घोषणा देता येणार नाही.

Om Birla
Ajit Pawar: अर्थसंकल्पाला 'लबाडाच्या घरच आवतान' म्हणणाऱ्या ठाकरेंना अजितदादांनी सुनावलं; दोघांमधील सांगितला फरक..

राजकीय पक्षांची चुप्पी

लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेच्या शपथ Oath घेण्याच्या नियमावलीत दुरुस्ती केली. तसेच कोणत्याही सदस्याला शपथे शिवाय कोणतेही अतिरिक्त शब्द तसेच घोषणा देता येणार नाही, असे निश्चित केले. लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला कोणत्याही राजकीय पक्षांनी विरोध केला नाही.

जय हिंदु राष्ट्र, जय पॅलेस्टिनच्या घोषणा

लोकसभेत शपथ घेताना असदुद्दीने ओवेसी यांनी जय पॅलेस्टीनची घोषणा दिली होती. त्यानंतर भाजपचे खासदार छत्रपाल गंगवार यांनी शपथ घेतल्या नंतर 'जय हिंदू राष्ट्र'चा घोषणा दिली होती. भाजपचे खासदार अतुल गर्ग यांनी शपथ घेतल्यानंतर 'अटल बिहारी वाजपेयी झिंदाबाद, नरेंद्र मोदी झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या होत्या.

Om Birla
Parali Firing Case Update : परळी गोळीबार प्रकरणात ट्विस्ट, खून झालेल्या बापू आंधळेंवर गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com