Smriti Irani : भाजपची तोफ असलेल्या इराणी झाल्या राहुल गांधींच्या फॅन; टी-शर्ट, भाषणांवर म्हणाल्या...

Politics Congress BJP : भाजप नेत्या स्मृती इराणी या नेहमीच राहुल गांधींवर कडक शब्दांत टीका करताना दिसतात. पण आता त्यांचे विचार बदलत असल्याचे जाणवत आहे.
Smriti Irani, Rahul Gandhi
Smriti Irani, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभव झाला अन् त्यांची धडाडणारी तोफही थंडावल्याचे दिसते. प्रामुख्याने त्यांचा पराभव करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर नेहमीच टीकास्त्र सोडताना दिसत होत्या. पण आता राहुल यांच्याविषयी त्यांचे मतपरिवर्तन झाल्याचे दिसत आहे.

स्मृती इराणी यांनी एका पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये बोलताना राहुल यांच्या राजकारणात बदल झाल्याचे विधान केले आहे. ते यशस्वी झाले, असे त्यांना वाटत आहे. जातीवर बोलताना ते सावधपणे बोलत आहेत. संसदेत पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घालून येतात. त्यातून ते युवकांना काय संदेश देत आहेत, हे त्यांना चांगले माहिती आहे. अनेक बाबतीत ते विचारपूर्वक पावले टाकत आहेत, असे कौतुकाचे बोल इराणींच्या तोंडून निघाले.

Smriti Irani, Rahul Gandhi
Mehbooba Mufti: निवडणुकीपूर्वीच माजी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; सांगितलं कारण...

इराणी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, राहुल गांधी वेगळ्या प्रकारचे राजकारण करत आहेत. तुम्हाला ते बरोबर किंवा चुकीचे वाटत असेल. पण ते वेगळे राजकारण करत आहेत. चर्चेत राहण्यासाठी ते वादग्रस्त विधाने करत आहेत. मिस इंडिया स्पर्धेत दलित किंवा आदिवासी स्पर्धक नसल्याबाबतचे त्यांचे विधान असेच आहे.

मिस इंडिया स्पर्धेशी सरकारचा काही संबंध नसल्याचे राहुल गांधींना माहिती आहे. पण तरीही ते सोशल मीडियात असे बोलतात, कारण त्यामुळे हेडलाईन बनते, असा टोला लगावण्यासही इराणी विसरल्या नाहीत. इराणी यांनी राहुल यांचा 2019 च्या निवडणुकीत पराभव केला होता. तर यावेळी राहुल यांनी पराभवाचा वचपा काढला.

Smriti Irani, Rahul Gandhi
CBI on Kejriwal News : केजरीवाल अन् गोव्यातील 'APP'च्या उमेदवारांबाबत 'CBI'चा मोठा दावा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राहुल गांधींचा उल्लेख बालकबुध्दी असा केला होता. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून राहुल यांचा असाच उल्लेख करत टीका केली जात आहे. यापार्श्वभूमीवर इराणी यांचे हे मत भाजपच्या इतर नेत्यांना मान्य होईल का? त्यांच्या या विधानांवर नेते काय बोलणार, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे.

राहुल यांच्या राजकारणाविषयी बोलताना इराणींना पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही तोंडभरून कौतुक केले. मोदींची लोकप्रियता कमी झाल्याच्या दाव्यांवर बोलताना त्यांनी ते कधीच कमजोर होऊ शकत नाही, असे विधान केले. मी त्यांना 20 वर्षे जेवढे पाहिले आहे, त्यावरून ते कधीही कमजोर दिसले नाहीत. मी त्यांना नेहमी राजकीय नजरेतून पाहिले आहे. ते 73 वर्षांचे आहेत. पंतप्रधान म्हणून 10 वर्षे काम केले. त्यांची एक प्रतिष्ठा आहे. त्यांचा सन्मान आपण राखायला हवी.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com