मोदी सरकारनं आधी गुडघे टेकले अन् आता कतारसमोर दंडवत! भाजप नेत्याचा घरचा आहेर

भाजपच्या बड्या नेत्यानंच मोदी सरकारला दाखवला आरसा
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : प्रेषित महंमद पैगंबर व मुस्लिम धर्म यांच्याबद्दल भाजप (BJP) नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. यानंतर भाजपने डॅमेज कंट्रोल म्हणून या दोन्ही नेत्यांना निलंबित केले असले तरी यामुळं मोदी सरकारची (Modi Government) जागतिक पातळीवर नाचक्की झाल्याची टीका होत आहे. यातच मोदी सरकारला भाजपमधूनच लक्ष्य केलं जाऊ लागलं आहे. भाजपच्या बड्या नेत्यानं यावरून मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मोदी सरकारने आधी रशिया, अमेरिका आणि चीनसमोर गुडघे टेकले होते, असा हल्लाबोल भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाली असून, या काळात अनेक वेळा भारत मातेला आपले शिर अपमानित होऊन झुकवावे लागले. लडाखवर चीनने हल्ला करून आपण त्यांच्यासमोर रांगत बसलो. रशियाच्या समोरही आपण गुडघे टेकले. तसेच, क्वाडमध्ये अमेरिकेसमोरही आपण झुकले. आता एका छोट्याशा कतारसमोर आपण साष्टांग दंडवत घातला आहे. हे आपल्या परराष्ट्र नीतीचे अपयश आहे.

भारत आणि कतारमधील आर्थिक संबंधांबाबतही स्वामींनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मुंबई विमानतळातील कतारच्या हिस्सेदारीत नवीन काय आहे? सध्याचा घटनाक्रम पाहता दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकमध्ये कतारची आधीच हिस्सेदारी असल्याचं स्पष्ट होतं आहे. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेची एक शाखा तर कतारची राजधानी दोहा येथून येणाऱ्या आदेशावर चालते. एका गुजराती आरोपीच्या अपहरणासाठी कतारच्या विमानांचा वापर करण्यात आला होता.

Narendra Modi
भाजप नेत्यांचा वाचाळपणा अन् आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी सरकार तोंडघशी

भारताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या आखाती देशांमध्ये वाढ होत आहे. कतार, इराण, कुवेतनंतर आता सौदी अरेबियानेही या प्रकरणी निषेध नोंदवला आहे. आखाती देशांनी तेथील भारतीय राजदूतांना बोलावून प्रेषित पैगंबराबद्दलच्या भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. भाजप नेत्यांकडूनच अशी विधाने केली जात असल्याने मोदी सरकावर बॅकफूटवर गेले आहे. भारताचे आखाती देशांशी असलेले द्वीपक्षीय संबंध अतिशय महत्वाचे आहेत. यामुळे मोदी सरकारला हे संबंध बिघडणे धोक्याचे आहे. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू हे कतारच्या दौऱ्यावर असतानाच हा नेमका वाद उफाळून आला आहे. दरम्यान, भाजपने या दोन्ही नेत्यांची हकालपट्टी केल्याबद्दल आखाती देशांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Narendra Modi
भाजपनं बाहेरचा रस्ता दाखवला अन् महिला नेत्यानं घेतली थेट पोलिसांकडे धाव!

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीनकुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून मोठा गदारोळ उडाला होता. यानंतर उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होेते. उत्तर प्रदेशातील हिंसाचारात चाळीसहून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी सुमारे दीड हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही याचे पडसाद उमटले होते. अखेर भाजपने शर्मांना पक्षातून चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केलं आहे. याचवेळी भाजपने जिंदाल यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com