निवडणुकीआधीच भाजपला धक्का, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जवळील दोन नेत्यांनी सोडला पक्ष, जाहीर केली भूमिका

BJP faces setback ahead of elections : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या दोन नेत्यांनी पक्ष सोडत आपली भूमिका जाहीर केली. जाणून घ्या संपूर्ण राजकीय घडामोडी.
Yogi Adityanath
Yogi Adityanathsarkarnama
Published on: 
Updated on: 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोरखपूरमध्ये भाजपच्या 2 महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजपचे नगरसेवक विश्वजित त्रिपाठी आणि शिक्षणतज्ज्ञ मुकेश शर्मा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

लखनऊ येथे समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी समाजवादी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. विशेष म्हणजे, योगी आदित्यनाथ यांचा प्रभाव असलेल्या गोरखपूरमधील भाजप नगरसेवकानेच पक्ष सोडल्याने या घडामोडीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Yogi Adityanath
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी; महाराष्ट्रासह देशाचे राजकारण बदलणार?

विश्वजित त्रिपाठी यांची घरवापसी

भाजपला सोडचिठ्ठी देणारे विश्वजित त्रिपाठी यांचा राजकीय प्रवासही चर्चेचा विषय ठरला आहे. ते यापूर्वी समाजवादी पक्षात होते. त्यानंतर त्यांनी सपाला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे गोरखपूरमधील राजकीय समीकरणांवर याचा काय परिणाम होणार, याकडे लक्ष लागले आहे.

मुकेश शर्मा यांनी सपामध्ये प्रवेश का केला?

शिक्षणतज्ज्ञ मुकेश शर्मा यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या अनेक शिक्षणसंस्था आहेत. पक्षप्रवेशानंतर त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले.

Yogi Adityanath
Delimitation bill 2026 : मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत; कोणत्या राज्यात किती जागा वाढणार?

दरम्यान, रायबरेलीमधील प्रभाकर गुप्ता आणि के. के. साहू यांनीही आपल्या समर्थकांसह समाजवादी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशांमुळे उत्तर प्रदेशात निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप या घडामोडींना कशा प्रकारे उत्तर देणार आणि समाजवादी पक्षाला याचा किती राजकीय फायदा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.