

BJP organisational reshuffle : देशात यावर्षी आसाम, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांसह पुद्दचेरी या केंद्रशासित प्रदेशात विदानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामध्ये दक्षिणेतील दोन राज्यांसह बंगाल ही भाजपसाठी सर्वात कठीण राज्ये मानली जातात. अद्याप एकदाही या राज्यांमध्ये भाजपला सत्ता काबीज करता आलेली नाही. या निवडणुकांसाठी काही महिन्यांच कालावधी उरलेला असताना भाजपमध्ये मोठा उलटफेर होणार आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकांची तयारी मागील काही महिन्यांपासून सुरू केली आहे. मात्र, संघटनात्मक पातळीवर सर्वात मोठा बदल होणार असल्याने संघटन ढवळून निघणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आज कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
निवडणूक प्रक्रियेत केवळ नबीन यांचा अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा, विविध राज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष तसेच इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नबीन यांच्याकडे अध्यक्षपदाची सुत्रे सोपविली जातील.
नबीन हे केवळ ४५ वर्षांचे असून भाजपचे सर्वात तरूण अध्यक्ष बनणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीकडे संपूर्ण देशातील भाजपची संघटनात्मक टीम डोळे लावून बसली आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर नबीन यांना लगेचच कामाला लागावे लागणार आहे. त्यांच्यासमोर पहिले आव्हान पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका हे असणार आहे. त्यातही बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळविण्याचे भाजपचे लक्ष्य त्यांच्यासाठी प्रमुख आव्हान असणार आहे.
पुढील वर्षीही सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात या मोठ्या राज्यांसह गोवा, मणिपूर, हिमाचल प्रदेश उत्तराखंड, पंजाब या राज्यांचा समावेश आहे. पंजाब व हिमाचल प्रदेश वगळता अन्य राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. ही सत्ता टिकविण्याचे आव्हान नबीन यांच्यासमोर असणार आहे.
नबीन यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असल्याने २०२८ मधील निवडणुकांमध्येही पक्षाला विजय मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यामध्ये छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मेघालय, नागालँड, कर्नाटक, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. तर जून २०२९ मध्ये लोकसभेची निवडणूक आहे. त्याधीच त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो. विद्यमान अध्यक्ष यांचा कार्यकाळही वाढविण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.