BMC Update : शिवसेना भवन माझे हृदय, नीट काळजी घे! उद्धव ठाकरेंनी फोन केलेल्या मनसे नगरसेवकाला राज ठाकरेंनी केलं 'नेता'...

Yashwant Killedar Group leader : यशवंत किल्लेदार यांच्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रीती पाटणकर मैदानात होत्या. त्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका होत्या.
Uddhav Thackeray & Raj Thackeray
Uddhav Thackeray & Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Yashwant Killedar MNS : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिल्यांदाच युती झाली होती. या निवडणुकीत ठाकरे बंधूंना एकूण ७१ जागांवर विजय मिळाला. त्यापैकी सहा जागांवर मनसैनिक निवडून आले. सहापैकी सर्वाधिक चर्चेचा विजय ठरला तो प्रभाग क्रमांक १९२ मधील.

मनसेचे उपशहर प्रमुख यशंवत किल्लेदार हे या प्रभागातून विजयी झाले आहेत. या प्रभागाचे वैशिष्ट्ये म्हणजे शिवसेना भवनही याच प्रभागात आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंसाठी या प्रभागातील विजय प्रतिष्ठेचा होता. किल्लेदार यांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवत विजय मिळविला. आता त्यांच्याच खांद्यावर राज ठाकरेंनी मोठी जबाबदारी टाकली आहे.

शिवतीर्थवर आज झालेल्या मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये किल्लेदार यांची महापालिकेतील पक्षाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. मनसेच्या वतीने ते महापालिकेत किल्ला लढविणार आहेत. किल्लेदार यांच्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रीती पाटणकर मैदानात होत्या. त्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका होत्या. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले होते.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
Mayor Reservation : महापौर आरक्षण सोडत 22 जानेवारीला; शिंदेकडील खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार संपूर्ण प्रक्रिया

किल्लेदार विजयी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना अभिनंदनासाठी केला होता. शिवसेना भवन माझे हृदय आहे. ते याच प्रभागात येते. त्यामुळे त्याची नीट काळजी घे, असे ठाकरे किल्लेदारांना म्हणाले होते. किल्लेदारांनीही तुमचे हृदय सांभाळले, असे म्हटले होते. आता याच किल्लेदारांवर राज ठाकरेंनी महापालिकेची महत्वाची जबाबदारी टाकली आहे.

Uddhav Thackeray & Raj Thackeray
Prakash Ambedkar News : शिवसेनेने भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला; प्रकाश आंबेडकर ठरले किंगमेकर...

दरम्यान, मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप-शिवसेना युती विरूध्द ठाकरे बंधू असा थेट सामना झाला होता. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. प्रत्यक्ष महापालिकेचे कामकाज सुरू झाल्यानंतरही हा टोकाचा वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे विश्वासू किल्लेदारांवर मोठी जबाबदारी असणार आहे. अर्थात उद्धव ठाकरेंचे शिलेदारांना सोबत घेऊनच त्यांना भाजप-शिवसेना युतीला भिडावे लागणार आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com