Amit Shah BJP Manifesto : ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजप सज्ज; 'या' 5 घोषणा ठरणार गेम चेंजर!

Amit Shah vs Mamata Banerjee political strategy : अमित शाह यांनी मिशन बंगालसाठी भाजपची रणनीती जाहीर केली. ममता बॅनर्जींसाठी मोठं आव्हान ठरणाऱ्या या घोषणांचा आढावा घ्या.
Amit Shah
Amit Shah Sarkarnama
Published on
Updated on

भाजपने पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकत्यात अयोजित कार्यक्रमात हा जाहीरनामा आपला जाहीरनामा सादर केला. या जाहीरनाम्याला 'भरोसा पत्र' असे नाव देण्यात आले आहे. या भरोसा पत्रात महिला, युवक आणि बेरोजगार अशा प्रमुख मतदार गटांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

अमित शाह यांनी सांगितले की, हा जाहीरनामा राज्यातील बेरोजगार युवक आणि महिलांना नवी दिशा देणारा ठरेल. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करत म्हटले की, गेल्या काही वर्षांत जनतेच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे आता बंगालमध्ये बदलाची गरज निर्माण झाली आहे.

Amit Shah
High Court Decision : पोटनिवडणुकीपूर्वी EVM बाबत हायकोर्टाचा मोठा निकाल; देशात पहिल्यांदाच घडणार 'असं' काहीतरी!

भाजपने आपल्या आश्वासनांमध्ये महिलांसाठी मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. प्रत्येक महिन्याच्या 1 ते 5 तारखेच्या दरम्यान महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा केले जातील, असे सांगण्यात आले. तसेच बेरोजगार युवकांनाही दरमहा 3000 रुपये भत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

याशिवाय, राज्यात 1 कोटी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. औद्योगिक विकासासाठी पहिल्या 100 दिवसांत ठोस रोडमॅप तयार केला जाईल, असेही सांगण्यात आले. दार्जिलिंग चहाला जागतिक स्तरावर प्रसिद्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Amit Shah
TET exam : TET बाबत महत्वाची बातमी; कोर्टाने 'या' शिक्षकांना परीक्षेतून वगळलं, राज्य सरकारला दिले आदेश

सुरक्षेच्या मुद्द्यावरही भाजपने कठोर भूमिका घेतली आहे. सीमांवर घुसखोरी रोखण्यासाठी ‘zero tolerance’ धोरण राबवले जाईल आणि सीमा अधिक सुरक्षित केल्या जातील. तसेच, जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी आयुष्मान भारतसारख्या सर्व केंद्र सरकारच्या योजना राज्यात लागू केल्या जातील.

भ्रष्टाचार आणि माफिया राज संपवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आता या आश्वासनांवर बंगालमधील जनता किती विश्वास ठेवते आणि निवडणुकीत कोणाला संधी देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com