Nitin Gadkari : मध्ये प्रदेशातील उज्जैनचे भाजप (BJP) खासदार अनिल फिरोजिया (Anil Ferozia) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडून मतदार संघाच्या विकासासाठी २३०० कोटी रुपये मिळवले आहे. फिरोजिया यांनी आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी तब्बल 32 किलो वजन घटवले आहे. गडकरी यांनी त्यांना प्रतिकिलो वेटलॉससाठी 1000 कोटी हिशोबाने विकास निधी देण्याची ग्वाही दिली होती.
फिरोजिया यांनी गडकरी यांचे आव्हान स्वीकारून 32 किलो वजन कमी केले. गडकरी यांनी फेब्रुवारी महिन्यात फिरोजिया यांना एका जाहीर कार्यक्रमात हे आव्हान दिले होते. हे आव्हान फिरोजिया यांनी स्वीकारले. त्यानंतर बोलताना फिरोजिया म्हणाले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'फिट इंडिया' आंदोलनाची सुरूवात केली आहे. गडकरी यांनी मला व्यासपीठावरून उज्जैनच्या विकासासाठी प्रतिकिलो वेटलॉससाठी 1 हजार कोटी देण्याची ग्वाही दिली. हे आव्हान मी स्वीकारले आहे. वजन कमी करून मतदार संघाच्या विकासासाठी आणखी निधी मिळवणार आहे.
फिरोजिया सोमवारी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, वजन कमी करण्यासाठी कठोर डायटचे पालन केले. सकाळी 5.30 वा. उठून मॉर्निंग वॉकला जातो. माझ्या सकाळच्या व्यायामामध्ये धावणे, व्यायाम व योगाचा समावेश असतो. आयुर्वेदिक डायट चार्ट फॉलो केला. हलका नाश्ता, दुपारी व रात्री जेवणात सलाड, एक वाटी हिरवी भाजी व मिश्रित कडधान्यापासून तयार झालेली एक पोळी, कधी-कधी मी गाजराचे सूप किंवा ड्राय फ्रुट्सही घेते, असे त्यांनी सांगितले.
फिरोजिया म्हणाले, गडकरींचे आव्हान स्वीकारून जवळपास 32 किलो वजन कमी केले. मी गडकरींची भेट गेऊन त्यांना वजन कमी केल्याची माहिती दिली. हे ऐकून ते खूपच आनंदी झाले. त्यानंतर त्यांनी आश्वासनानुसार माझ्या मतदारसंघासाठी 2300 कोटींच्या विकास योजनांना मंजुरी दिली.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.