Parliament Session Live : संसदेत मेधा कुलकर्णी यांनीच केली सरकारची पोलखोल; शिवाजी महाराजांच्या गडांसह शनिवारवाड्याचा उल्लेख करत मांडला महत्वाचा मुद्दा...

Medha Kulkarni Parliament speech : तमिळनाडूतील एका किल्ल्यासह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.
Medha Kulkarni in Parliament
Medha Kulkarni in ParliamentSarkarnama
Published on
Updated on

Heritage conservation Maharashtra : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचे साक्षीदार असलेल्या 12 किल्ल्यांचा यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत काही महिन्यांपूर्वीच समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 11 किल्ले महाराष्ट्रातील एक किल्ला तमिळनाडूतील आहे. या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही जोरदार स्वागत केले. पण आता भाजपच्या महिला खासदाराने किल्ल्यांवरील समस्यांचा पाढा वाचत आपल्याच सरकारची संसदेत पोलखोल केली आहे.

भाजपच्या पुण्यातील राज्यसभेच्या खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी किल्ल्यांवरील समस्यांना आज संसदेत वाचा फोडली. यूनेस्कोच्या वारसा यादीत समावेश होऊन या किल्ल्यांवर पायाभूत सुविधा नसल्याचे सांगत त्या म्हणाल्या, शिवाजी महाराजांनी ज्या राज्यात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, मी तिथली असल्याचा मला गर्व आहे.

अशा महाराष्ट्रातील शिवनेरी, राजगड अशा ११ किल्ल्यांचा समावेश युनेक्सोच्या वारसा यादीत केला आहे. याआधीही अजिंठा, वेरूळ आणि धारापुरी गुफांचाही समावेश केला होता. इतर काही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने संरक्षित केलेली ठिकाणे आहेत, ज्याचा आम्हाला गर्व आहे, जसे की पुण्यातील शनिवारवाडा, असे कुलकर्णी म्हणाल्या.

Medha Kulkarni in Parliament
Maharashtra Assembly Session : ठाकरे देणार भास्कर जाधवांना धक्का? अधिवेशन सुरू होण्याआधीच सामंतांकडून गौप्यस्फोट

अशा ऐतिहासिक ठिकाणी देशविदेशातील पर्यटक जातील, तेव्हा ते तिथे काय पाहतील आणि इतिहासाची काय माहिती घेतील? तिथे फलक नाहीत, डिजिटल गाईड नसतात. तिथे स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सुविधाही नसते. मी प्रत्येक वाढदिवसाला एका किल्ल्यावर चालत जाते. यावर्षी मी राजगडावर गेले होते. तिथली स्वच्छतागृह कचराकुंडी बनले होते. ते अजिबात वापरायोग्य नव्हते, अशी नाराजी कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

ऐतिहासिक स्थळांवरील प्लॅस्टिकचा एवढा कचरा असतो, तो खाली आणता येत नाही. तो तिथेच जाळला जातो. त्यामुळे पर्यावरणाचाही प्रश्न निर्माण होतो. अन्यथा हा कचरा जंगला फेकला जातो, त्याने वन्यजीवांची हानी होते. हेरिटेज अपग्रेडेशन पॅकेज या आर्थिक वर्षात सुरू करावे, अशी महत्वाची मागणी कुलकर्णी यांनी केली. असे आगामी तीन महिन्यांत अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करावे. हेरिटेड अमिनिटी अपग्रेडेशन पॅकेज देण्याची मागणीही त्यांनी केली.

Medha Kulkarni in Parliament
Chief Minister Issue : मुख्यमंत्रिपदासाठी 500 कोटी द्या, खुर्ची मिळवा! काँग्रेसमधील बड्या नेत्याच्या पत्नीने उडवून दिली खळबळ

युनेस्कोच्या यादीतील किल्ले – राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जिंजी (तामिळनाडू). 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com