Delhi News : बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभा सभागृहाच्या विशेषाधिकार समितीने भारतीय जनता पार्टीचे नेते व खासदार रमेश बिधुरी यांना ७ डिसेंबर रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. यासोबतच खासदार बिधुरींनी ज्यांच्याबद्दल हे वक्तव्य केले ते बसपाचे खासदार दानिश अली यांना लोकसभा समितीसमोर तोंडी जबाब देण्यासाठीही बोलावले आहे. दरम्यान, यापूर्वीही बिधुरी हे समितीसमोर उपस्थित राहिलेले नव्हते. त्यामुळे ते आता तरी उपस्थित राहतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
बिधुरी यांना बजावण्यात आले की बसपाचे खासदार अली उपस्थित होतील, त्याच दिवशी समितीसमोर उपस्थित राहावे. मात्र, यापूर्वीही बिधुरी यांनी उपस्थित राहण्यास सांगितले असूनही ते उपस्थित राहिले नव्हते. बिधुरी यांच्यावर २१ सप्टेंबर रोजी चांद्रयान-३ आणि अंतराळ क्षेत्रातील भारताच्या यशावर लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान अली यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप आहे.
दानिश अली यांच्याशिवाय लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि इतर अनेक सदस्यांनी सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून बिधुरी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्याची विनंतीही या खासदारांनी केली होती.
दुसरीकडे भाजप खासदार निशिकांत दुबे आणि रवी किशन यांनी बिर्ला यांना पत्र लिहून अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा दावा केला होता. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्याची विनंतीही त्यांनी केली होती. सर्व तक्रारी समितीकडे पाठवण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.