BJP Questions to Congress: रामलीलावरील आंदोलनापूर्वीच भाजपचं काँग्रेसला खुलं चॅलेंज! विचारले ५ प्रश्न, तिसऱ्या प्रश्नामुळं काँग्रेसच्या अडचणी वाढणार?

BJP Questions to Congress: इंडिया आघाडीच्यावतीनं १ नोव्हेंबरला रामलीला मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
Narendra Modi, Rahul Gandhi
Narendra Modi, Rahul GandhiNarendra Modi, Rahul Gandhi
Published on: 
Updated on: 

BJP Questions to Congress: इंडिया आघाडीच्यावतीनं १ नोव्हेंबरला रामलीला मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेसकडून जोरदार कॅम्पेनिंग केलं जात आहे. 'चलो दिल्ली' या टॅगखाली काँग्रेसनं देशभरातील समर्थकांना दिल्लीत येण्याचं आवाहन केलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपनं काँग्रेस महत्वाचे ५ प्रश्न विचारले आहेत. यातील तिसऱ्या प्रश्नामुळं काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

भाजपचे खासदार आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजुजी यांनी ट्विटरवर काँग्रेसला काही प्रश्न विचारले आहेत. त्यांनी म्हटलं की, मी काँग्रेस पक्षाला काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं देण्याचं आव्हान देतो....

  1. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत, जेव्हा निवडणूक आयुक्तांची नियुक्ती काँग्रेसच्याच सरकारनं केली होती, तेव्हा काँग्रेसला केवळ ४४ खासदार कसे मिळाले?

  2. २०२४ मध्ये जेव्हा ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) नव्हते, तेव्हा काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा पराभवाचा सामना कसा करावा लागला?

  3. २०१४ ते २०२६ या काळात ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारं स्थापन झाली, त्या राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री राजीनामा देतील का? आणि त्याबद्दल माफी मागतील का?

  4. मतदार यादीतील बेकायदेशीर स्थलांतरित, मृत व्यक्ती, स्थलांतरित झालेले लोक किंवा दुबार नोंदणी असलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून काढून टाकली पाहिजेत की नको?

  5. १९५२-५६, १९५८-६१, १९६५-६६, १९८३-८४, १९८७-८८, १९९३, १९९५ आणि २००२-२००४ या काळात राबवण्यात आलेली 'एसआयआर' बेकायदेशीर होती का?

दरम्यान, हे प्रश्न विचारल्यानंतर भाजपनं काँग्रेसच्या घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा उकरुन काढत या कुटुंबाला बाह्यशक्तींकडून प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप केला. रिजुजी म्हणाले, "एका कुटुंबाच्या मालकीचा हा पक्ष, बाहेरील शक्तींच्या मदतीने भारतीय संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे" अशा प्रकारे त्यांनी काँग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.

Narendra Modi, Rahul Gandhi
Lata Mangeshkar Music School: लता मंगेशकर संगीत विद्यालयाला भाजपचा ब्रेक! महापौर निवास उभारण्याचा निर्णय; शिंदेंच्या मंत्र्यांचा कडाडून विरोध

इंडिया आघाडीचा १ नोव्हेंबरला मोर्चा

इंडिया आघाडीकडून १ नोव्हेंबरला 'चलो दिल्ली' नावानं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. रामलीला मैदानावर हे आंदोलनं केलं जाणार आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यापूर्वीही काँग्रेसनं ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत चक्काजाम केला आहे. आता १ नोव्हेंबरच्या मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.