Ashok Gehlot : भाजपने 'जय श्रीराम'चा नारा देऊन सीता मातेचं नाव प्रभू रामापासून वेगळं केलं : अशोक गेहलोत

Ashok Gehlot News : अशोक गेहलोत यांच्या वक्तव्याने राजकारण तापण्याची शक्यता
Ashok Gehlot
Ashok GehlotSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ashok Gehlot News : भाजपने 'जय श्रीराम' नारा देऊन सीता मातेचं नाव प्रभू रामापासून वेगळं केल असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी भाजपवर केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.

भाजप 'जय सिया राम' असा नारा का देत नाही? असा सवाल उपस्थित करत भारत देश हा सीता मातेचा सन्मान करणारा आहे. मात्र तरी देखील भाजप कधीही'जय सिया राम' असा नारा देत नाही? असं म्हणत गेहलोत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते आज जयपूरममध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Ashok Gehlot
Shivsena News: सत्तारांचा कृषी महोत्सव वादात ; दानवे म्हणाले, अन्नदात्याचे खिसे कापू पाहत आहेत..

गेहलोत म्हणाले, ''जय श्रीराम असा नारा देऊन भाजपने लोकांना भडकवण्याचे काम केले आहे. यामधूनच भाजप आणि संघ द्वेष निर्माण करतात. पण राहुल गांधी हे नेहमी प्रेम आणि आपुलकीचं समाजकारण करतात. भाजप आणि संघाने सीता मातेला प्रभू श्रीरामापासून वेगळं करण्याचं काम केलं. भारत देश आदराने जय सीया राम असं म्हणतो. मात्र भाजपने मुद्दामहून जय श्रीराम चा नारा दिला'', असं ते म्हणाले.

Ashok Gehlot
Karnatak News : निवडणुकांपूर्वी भाजपला मोठा धक्का ; नवा पक्ष रिंगणात, बोम्मईंना आव्हान!

''मात्र आता भाजपचा तिरस्कार पसरवण्याचा प्रयोग कधीही यशस्वी होणार नाही. जनता त्यांना योग्य उत्तर देईल. भाजपला प्रभू रामचंद्रांवर विश्वास नसल्यामुळेच ते हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये मतभेद करत वाद पसरवत आहेत. देशात संघ आणि भाजपचेच लोक हिंदू आहेत असं वातावरण भाजपने तयार केलंय. पण मग इतर लोक हिंदू नाहीत का?'' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Ashok Gehlot
Aurangabad Political : दानवे मुलीला आमदार करूनच थांबणार ? कन्नडमध्ये हायवोल्टेज ड्रामा होणार..

''सीता मातेचा सन्मान करणं भाजप आणि संघाला ठाऊक नाही. मात्र राहुल गांधी हे महात्मा गांधींच्या सिद्धांतांवर चालत आहेत'', असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले. दरम्यान, आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपामुळे कॉंग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.