Trupti Desai : वाल्मिक कराड देखील आजारी, धसांनी त्याचीही जेलमध्ये भेट घ्यावी, तृप्ती देसाईंचा खोचक सल्ला

Trupti Desai suresh dhas Walmik Karad : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये भाजप आमदार सुरेश आणि मंत्री धनंजय मुंडे देखील आले होते.
Trupti Desai suresh dhas  Walmik Karad
Trupti Desai suresh dhas Walmik Karad sarkarnama
Published on
Updated on

Pune News : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर गेले दोन महिने भाजपा आमदार सुरेश धस यांनी सातत्याने अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावती निशाणा साधला आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याचे समोर आला आहे.

त्यानंतर सुरेश धस यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील वाल्मिक कराड हे देखील आजारी असून त्यांची देखील सुरेश धस यांनी जेलमध्ये जाऊन भेट घ्यावी, असा खोचक सल्ला दिला आहे.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी देखील याबाबत आपली भूमिका सोशल मीडियावर मांडली आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, वाल्मीक कराडला स्लीप एप्नियाचा त्रास आहे, त्यामुळे एक पारिवारिक आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडचीसुद्धा जेलमध्ये भेट घ्यावी असाच खोचक सल्ला तृप्ती देसाई यांनी धस यांना दिला आहे.

Trupti Desai suresh dhas  Walmik Karad
Amit Deshmukh News : नानाभाऊ उर्जावान नेते, त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल! अमित देशमुखांनी व्यक्त केला विश्वास

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये भाजप आमदार सुरेश यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला मंत्री धनंजय मुंडे देखील आले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल चार तास बैठक झाली असल्याचं सांगितलं जात आहे.

या भेटी बाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील खुलासा केला असून ही भेट झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच या दोन्ही नेत्यांमधील मतभेद कमी करण्यासाठी ही भेट घडवून आणल्याचे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते.

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतले असल्याचं सांगितलं जात आहे. धनंजय मुंडे यांचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली असल्याचे देखील सुरेश धस यांनी स्पष्ट केला आहे. हॉस्पिटलमध्ये आजारी असलेल्या व्यक्तीला भेटायला जाणं ही आपली संस्कृती असल्याचं देखील या भेटीबाबत स्पष्ट कर देताना धस यांनी सांगितला आहे. या दोन गुप्त भेटीमुळे सुरेश धस यांच्या भूमिकेबाबत आता प्रश्न उपस्थित करण्यास नेत्यांनी सुरुवात केली आहे.

Trupti Desai suresh dhas  Walmik Karad
Pune BJP : विधानसभा निवडणुकीनंतर अमित शाह पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर, राजकीय कार्यक्रमासाठी भाजपची फिल्डिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com