BJP Breaking News : लोकसभेला सपाटून मार, भाजपकडून महाराष्ट्रातील 3 नेत्यांवर मोठी जबाबदारी

Maharashtra Politics : राज्यातील तीन दिग्ग्ज नेत्यांची मोठ्या पदावर वर्णी लावली आहे. येत्या काळात त्यांच्या खांद्यावर विविध राज्यातील प्रभारी - सहप्रभारी यांची जबाबदारी असणार आहे.
Ajit gopchade, Prakash Jawdekar, Vinod tawde
Ajit gopchade, Prakash Jawdekar, Vinod tawde Sarakarnama
Published on
Updated on

New Dilli News : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये अनेक संघटनात्मक बदल करण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्यानंतर आतापासूनच संघटनेतील जबाबदारीच्या पदाचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील तीन दिग्ग्ज नेत्यांची मोठ्या पदावर वर्णी लावली आहे. येत्या काळात त्यांच्या खांद्यावर विविध राज्यातील प्रभारी - सहप्रभारी यांची जबाबदारी असणार आहे.

भाजपकडून (Bjp) नुकतीच दिल्लीत संघटनात्मक बैठक पार पडली. यामध्ये विविध राज्यातील प्रभारी - सहप्रभारी यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील या तीन नेत्यांकडे विविध राज्यांच्या प्रभारी पदाची संधी देण्यात अली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता मोठी जबाबदारी असणार आहे. (Bjp News)

राज्यातील माजी मंत्री व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याकडे बिहारच्या प्रभारी पदाची जबाबदारी कायम असणार आहे. त्यासोबतच माजी मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांच्याकडे केरळच प्रभारी पद कायम असणार आहे. या दोघांकडे पूर्वीचे पद कायम ठेवण्यात आले आहे.

राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे मणिपूर राज्याचे प्रभारी पद सोपविण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात या तीन नेत्यांना राज्या सोबतच या तीन राज्यात पक्ष वाढीसाठी येत्या काळात प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वांचे या तिघांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

Ajit gopchade, Prakash Jawdekar, Vinod tawde
Haribhau Bagde News : भाजपला धक्का फिक्स, शिंदेंचं ठरलं ; सावे, दानवे अन् बागडेंच्या मनधरणीला अपयश

भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपकडून नव्या पक्षाध्यक्षाचा शोध सुरू झाला आहे. आतापर्यंत चर्चेत असलेल्या चार-पाच नेत्यांचा मंत्रिमडळात समावेश झाल्यामुळे सुनील बन्सल, विनोद तावडे, ओम माथूर, के. लक्ष्मण या चारही मोदी-शहांच्या विश्वासातील नेत्यांचा विचार केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

नड्डांची पक्षाध्यक्षपदाची मुदत 30 जूनला संपली आहे. नड्डांचा तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

Ajit gopchade, Prakash Jawdekar, Vinod tawde
BJP Vs Vijay Wadettiwar : 'विजय वडेट्टीवार अदानी बद्दल बोलताना तुमचे मालक...? ' ; भाजपने प्रत्युत्तर देत लगावला टोला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com