Karnataka Assembly Election : भाजपचा कर्नाटकमध्ये उमेदवार निवडीसाठी 'अमेरिकन पॅटर्न'; काय आहे प्रक्रिया?

Karnataka BJP Candidate : काँग्रेसने १२४ जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली
Amit Shah, Narendra Modi
Amit Shah, Narendra ModiSarkarnama

Karnataka BJP News : कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यासाठी २२४ जागांपैकी कर्नाटक काँग्रेसने १२४ जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान, भाजपने आपल्या उमेदवारांच्या निवडीसाठी अमेरिकन अध्यक्षीय पदाबाबत राबविल्या जाणाऱ्या पद्धतीचा अवलंब केला आहे. या प्रक्रियेमुळे काँग्रेससह भाजपच्या विद्यमान आमदारांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Amit Shah, Narendra Modi
Mallikarjun Kharge : कर्नाटकात खर्गेंच्या नेतृत्वाचा कस; होम ग्राऊंड देणार अध्यक्षीय इनिंगसाठी पाठबळ...

याबाबत पक्षाने शुक्रवारी (ता. ३१ मार्च) बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी भाजपचे (BJP) राज्य उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराणा म्हणाले, "अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या निवड प्रक्रियेचा वापर करून भाजप राज्यातील विधानसभेच्या उमेदवारांची निवड करणार आहे. कर्नाटकमध्ये (Karnataka) भाजप विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघ पातळीवर संभाव्या तीन उमेदवारांची निवड केली. त्यांना तळागाळात काम करणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केले. त्यातून उमेदवार निवड प्रक्रियेत आपलाही विचार केला जात आहे, याची जाणीव कार्यकर्त्यांत रुजली आहे. यामुळे अंतर्गत मतभेद दूर होण्यासाही मदत झाली."

Amit Shah, Narendra Modi
Thackeray Vs Shinde : उदय सामंतांचा गौप्यस्फोट : ठाकरे गटातील १३ आमदार आमच्या संपर्कात

या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक म्हणून दोन ज्येष्ठ नेत्यांची नेमणूक केली होती. प्रत्येक मतदारसंघात सुमारे १५० पक्ष सदस्यांनी मतदान केले. यात मतदारसंघानिहाय मंडल समितीचे अध्यक्ष, सदस्यांसह पक्षाच्या विविध सात संघटानेचे सदस्य (महिला, ओबीसी, एसी, एसटी, युवक, शेतकरी आणि अल्पसंख्यांक) यांचा मतदारांमध्ये समावेश होता.

भाजपने (BJP) अवलंबलेल्या या निवड प्रक्रियेमुळे विद्यमान आमदारांची चिंता वाढलेली आहे. मात्र या प्रयोगामुळे विद्यामान आमदारांच्या जागी नवीन चेहऱ्यांची वर्णी लागणार की नाही याबाबत स्पष्टता नसल्याचे सुराणा यांनी सांगितले. ते म्हणाले, "जिंकण्याची क्षमता असणाऱ्या आमदारांनी चिंता करण्याची गरज नाही."

Amit Shah, Narendra Modi
Konkan News : दीपक केसरकरांविरोधात ठाकरे गटाचे 'एप्रिल फुल' आंदोलन : ‘एप्रिल फुल आणि आमदार गुल’ ची घोषणाबाजी

या निवडप्रक्रियेतील प्रत्येक मतदारसंघासाठी निवडलेल्या तीन नावांची यादी शनिवार आणि रविवारी प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हा समितीद्वारे छाननी होणार आहे. या छाननीच्या आधारे संभाव्य यादी तयार करण्यासाठी राज्य समितीची पुढील आठवड्याच्या सुरुवातीला बैठक होईल. त्यानंतर ही यादी भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीकडे पाठवली जाणार आहे. त्यांच्याकडून ही यादी १० एप्रिलपर्यंत अंतिम होण्याची अपेक्षा असल्याचेही भाजपच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पहिली उमेदवार यादी असाच प्रयोग करून जाहीर केली होती. त्यावेळी, तिकिट इच्छुकांकडून दोन लाख रुपये शुल्कासह अर्ज मागविण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com