BLOs Deaths: निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेत BLOच्या डोक्यावर नेमकं कशाचं ओझं? गेल्या काही दिवसांत 14 जणांनी संपवलं जीवन; वाचा सविस्तर

BLOs Deaths: प्रामुख्यानं मतदार याद्या दुरुस्त करण्याचं काम या BLOs वर सोपवलं जातं, पण हे काम जीवन संपवण्याइतकं तणावाचं का बनलं आहे? नेमकं हे काम काय आहे? असा सवालही आता विचारला जात आहे.
Election Commission_BLOs Deaths
Election Commission_BLOs Deaths
Published on
Updated on

BLOs Deaths: निवडणूक आयोगासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेत मदत व्हावी म्हणून सरकारी कर्मचारी असलेल्या व्यक्तींची Block Level Officers (BLOs) म्हणून नेमणूक केली जाते. पण गेल्या काही दिवसांत तब्बल 14 BLOs नं आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहेत. निवडणुकीच्या कामकाजाचा प्रचंड तणाव असल्यानं तसंच आता हे सहनशिलतेच्या बाहेरचं असल्यानं आपण जीवन संपवत आहोत, अशा सुसाईड नोट लिहीत काही BLOनी स्वतःचं जीवन संपवलं आहे. त्यामुळं या BLOs च्या डोक्यावर नेमकं कुठलं ओझं आहे? असा सवाल विचारला जात आहे. नेमक्या किती आणि कुठल्या BLOsनी आपलं जीवन संपवलं हे सविस्तर जाणून घेऊयात.

Election Commission_BLOs Deaths
Ameya Khopkar: मनसेतल्या 'त्या' बिभीषणाच्या शोधात अमेय खोपकर पुण्यात? बैठक अन् झाडाझडती; पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

गेल्या काही दिवसांत ज्या BLOsचा मृत्यू झाला त्यामध्ये सर्वाधिक मध्य प्रदेशातील ४ तर राजस्थानातील ३ जणांचा समावेश आहे. तसंच गुजरातमधील २, पश्चिम बंगालमधील २, केरळातील १ आणि तामिळनाडूतील २ जणांचा समावेश आहे.

  1. गुजरात: BLO अरविंद वाढेर यांची आत्महत्या

  2. गुजरात: BLO रमेश यांचा मृत्यू

  3. पश्‍च‍िम बंगाल: BLO शांत‍ि यांची आत्महत्या

  4. केरल: BLO अनीश यांची आत्महत्या

  5. राजस्‍थान: BLO मुकेश यांची आत्महत्या

  6. राजस्थान: BLO हरिओम यांचा मृत्यू

  7. राजस्थान: SIR सुपरवाइजर संतराम यांचा मृत्यू

  8. मध्‍य प्रदेश: BLO उदयभान यांची आत्महत्या

  9. मध्य प्रदेश: BLO भुवन यांचा मृत्यू

  10. मध्य प्रदेश: BLO रमाकांत यांचा मृत्यू

  11. मध्य प्रदेश: BLO सीताराम यांचा मृत्यू

  12. पश्‍च‍िम बंगाल: BLO नम‍िता यांचा मृत्यू

  13. तमिलनाडु: BLO जहिता यांची आत्महत्या

  14. तम‍िलनाडु: आंगनबाड़ी सेव‍िकेनं केला आत्‍महत्‍येचा प्रयत्न

Election Commission_BLOs Deaths
Girish Mahajan : गिरीश महाजन भाजपच्याच मंत्र्याची कॉपी करायला गेले अन् डाव अंगलट आला : संकटमोचकच संकटात

आत्महत्याचं नेमकं कारण काय?

माध्यमातील विविध वृत्तांनुसार, गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील कोडिनार तालुक्यातील छारा गावात SIR चं काम करत असलेले BLO (शिक्षक) अरविंद वाढेर यांनी कामाच्या तणावातून आत्महत्या केली. या घटनेनं संपूर्ण शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसंच शिक्षक संघटनांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. ४० वर्षीय BLO वाढेर यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या पत्नीला पत्र लिहिलं, यामध्ये ते म्हणतात, माझ्याकडून आता हे SIRचं काम होणार नाही. मी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दमलो असून मला प्रचंड तणावही आला आहे. तू मुलाची आणि स्वतःची काळजी घे. माझं तुमच्या दोघांवर खूप प्रेम आहे. पण मी आता खूपच असहाय्य झालो आहे त्यामुळं माझ्याकडं आत्महत्येशिवाय आता दुसरा पर्याय राहिलेला नाही.

Election Commission_BLOs Deaths
Pune Police : पुणे पोलिसांचा मुळावरच घाव; थेट मध्य प्रदेशमध्ये घुसून संपवली गुन्हेगारीची पैदास

गुजरातच्याच खेडा इथं देखील एका BLOनं आपलं जीवन संपवलं आहे. तसंच जलपाईगुडी (प. बंगाल) मध्ये एका BLOनं आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. राजस्थानात अशीच दोन प्रकरणं समोर आली आहेत. यांपैकी एका BLOचा तणावातून हार्टअटॅकनं मृत्यू झाला. तर जयपूरमध्ये एका सरकारी शाळेतील शिक्षकानं १६ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. या शिक्षकाच्या कुटुंबियांनी आरोप केला की, मतदार यादीशी संबंधित कामासाठी ते प्रचंड दबावाखाली काम करत होते.

तर तामिळनाडूच्या कुंभकोणम इथं एका वरिष्ठ अंगणवाडी कर्मचारी आणि BLO म्हणून काम करणाऱ्या महिलेनं मतदार याद्यांच्या कामामुळं तणावग्रस्त होऊन झोपेच्या ४४ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तसंच केरळच्या कुन्नूर इथं एका BLOनं एसआयआरशी संबंधित तणावातून स्वतःच जीवन संपवलं. पश्चिम बंगालच्या पूर्ण वर्धमान जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी एका BLOचा ब्रेन स्ट्रोकनं मृत्यू झाला. त्यांना ब्रेन स्ट्रोक हा मानसिक ताणतणावातूनच झाला असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com