New Delhi : भारत राष्ट्र समितीचे ज्येष्ठ नेते खासदार के. केशव राव यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची 11 वर्षांनी काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. ते आंध्र प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी गुरूवारी खासदारकीची राजीनामा दिला आहे.
केशव राव यांनी राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहून राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे कळवले आहे. ते तेलंगणामधून 2020 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांनी बीआरएसकडून मिळालेली खासदारकी सोडली आहे.
काँग्रेसची ताकद केशव राव यांच्या घरवापसीमुळे वाढली आहे. त्यांनी बुधवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर अनेक नेत्यांनी के. चंद्रशेखर राव यांची साथ सोडली आहे. मागीलवर्षी विधानसभा निवडणुकीत केसीआर यांचा दारूण पराभव झाला. तर लोकसभा निवडणुकीतही पक्षाला एकही जागा मिळालेली नाही.
राव हे अनेक वर्षांपासून केसीआर यांच्यासोबत होते. काही दिवसांपुर्वीच त्यांनी बीआरएसला रामराम ठोकला होता. काल त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली. त्यांनी 2014 च्या निवडणुकीआधी त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. ते आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्या कार्यकाळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते.
85 वर्षीय केशव राव अनेक वर्षांपासून राजकारणात असून आंध्र प्रदेशसह तेलंगणातील काही भागांत त्यांचा दबदबा आहे. आंध्र प्रदेश सरकारमध्ये ते तीनदा मंत्री होती. बीआरएसमध्ये ते तिसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जात होते. केसीआर यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. पण विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर त्यांनीही साथ सोडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.