Maharashtra Budget Session 2024 Rahul Narvekar Neelam Gorhe News : विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय सुरु आहे. सभागृहात सदस्य नेहमीच आपले प्रश्न मांडत असतात आज (गुरुवारी) खुद्द उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत खंत व्यक्त केली.
विधीमंडळ परिसरातील कामकाजाबाबत कुणाचे अधिकार चालणार ? यावरुन आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. अधिकार कुणाचे चालणार ? यावरून विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती आमने-सामने आले. नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर गोऱ्हे संतापल्या.
विधीमंडळ परिसरात होत असलेल्या कार्यक्रमांबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सभागृहाला दिली. काही दिवसापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरणाचा सोहळा झाला. या कार्यक्रमाविषयी शेवटपर्यंत कोणतीच माहिती अध्यक्षांनी दिली नाही, असा आरोप गोऱ्हे यांनी यावेळी नार्वेकरांवर केला.
अध्यक्षांनी उपसभापती यांना विश्वासात न घेणे हे योग्य नसल्याचे सभागृहातील विरोधी पक्षांच्या आमदारांची भावना असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. उपसभापती गोऱ्हे यांच्या अधिकारांबाबत गटनेत्यांनी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
विधिमंडळाच्या आवारात बुधवारी (ता. १५ मार्च) संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाबाबत नीलम गोऱ्हे यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.
हा मुद्दा विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. यावर आमदार कपिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत सभागृहाला सभापती नसताना उपसभापती यांनाच सर्व हक्क आणि अधिकार आहेत, ज्यामुळे उपसभापती यांना डावलून निर्णय घेणे म्हणजे या सभागृहाचा अवमान करण्यासारखे आहे, असे मत व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.