CAA News : मी राजीनामा देईन, जर..! भाजपच्या आणखी एका मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Himanta Biswa Sarma News : सीएएच्या मुद्द्यावरून राज्यात आंदोलन सुरू असल्याने सरमा यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच विरोधकांना आव्हानही दिलं आहे.
Himanta Biswa Sarma
Himanta Biswa SarmaSarkarnama
Published on
Updated on

Assam News : हरियाणामध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरू असताना आसाममध्येही भाजप सरकारची डोकेदुखी वाढली आहे. हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नायब सिंह सैनी राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. एकीकडे या घडामोडी सुरू असताना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma News) यांनीही राजीनाम्याची भाषा केली आहे.  

केंद्र सरकारने (Central Government) काल देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA News) लागू केला. त्याचे पडसाद आता देशभरात उमटू लागले आहेत. प्रामुख्याने सीएएविरोधात आसाममध्ये (Assam) आंदोलन पेटले आहे. कायदा लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेक विरोधी पक्ष व संघटनांनी एकत्रित येत बंदची हाक दिली आहे. तसेच ठिकठिकाणी आंदोलनही सुरू आहे.

Himanta Biswa Sarma
Haryana Political News : आघाडीतून बाहेर पडलेल्या पक्षालाच भाजपने फोडले? दहापैकी पाच आमदार गायब...

आसाममध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून, सुरक्षाव्यवस्थाही कडेकोट करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री सरमा म्हणाले, मी आसामचा एनआरसीसाठी (NRC) अर्ज न केलेल्या एकाही व्यक्तीला नागरिकत्व मिळाले तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईल. राजीनामा देणारा पहिला व्यक्ती मी असेन.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सीएएबाबत काही नवीन करण्यात आलेले नाही. हे आधीपासून लागू आहे. आता केवळ पोर्टलवर अर्ज करण्याची वेळ आली आहे. कायद्याला विरोध करणाऱ्यांचा दावा खरा की खोटा, हे पोर्टलवरील माहितीमुळे सर्व काही स्पष्ट होईल. अर्ज न करता एकाही व्यक्तीला नागरिकत्व मिळाले तर पहिला राजीनामा मी देईन, असे सरमा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आसाम पोलिसांनी (Police) राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना नोटीस बजावली आहे. विरोधी पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी शांततेचे आवाहन केले होते. पण त्याला न जुमानता विरोधी पक्षांसह विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

आसाम आणि बांगलादेशच्या सीमेवरून घुसखोरीचे प्रमाण मोठे आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील हिंदूंनीही सीएए कायद्याला विरोध केला आहे. केंद्र सरकार आणि 16 पक्षांच्या संयुक्त विरोधी मंच यांच्यात 1985 मध्ये झालेल्या कराराचे या कायद्यामुळे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे याविरोधात पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

R

Himanta Biswa Sarma
Nayab Singh Saini News : हरियाणाला मिळणार नवे मुख्यमंत्री; आधी आमदार, खासदार अन् आता CM...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com